पुणे:- आजपर्यंत आपण अनेक शाळांचे सहली त्या त्या जिल्ह्यात तसेच राज्यातील इतरत्र भागात गेलेल्या पाहिलं असेल मात्र पी एम श्री जिल्हा परिषद लासुरगाव शाळेची 42 विद्यार्थी आणि शिक्षकांची सहल ही विमानाद्वारे हैदराबाद या ठिकाणी गेली आणि यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच विमानात बसून या सहेलीच आनंद घेतला.
३० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून या विद्यार्थ्यांची सहल रवाना झाली आणि यावेळी या विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथे जाऊन विविध ठीकाणांची पाहणी देखील केली.वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अग्रेसर असलेली पीएमश्री हायस्कूल लासुरगाव यांच्या आणखी एका नव्या उपक्रमाद्वारे परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जी मीना, शिक्षणाधिकारी जयश्रीताई चव्हाण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील विद्यार्थ्यांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे वैजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर,शिविअ बाळासाहेब म्हस्के मनीष दिवेकर, लासुरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान कोळसे यांनी देखील यासाठी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.
संभाजीनगर जिल्ह्यात बोटावर मोजता येईल एवढ्याच शाळेनेआतापर्यंत विमानाने सहल नेलेलेली आहे त्यामध्ये लासूरगावची शाळा सहभागी झाली.
प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश माधवराव राऊत यांच्या पुढाकारातून सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या सहलीचे कौतुक आत्ता परिसरात सर्वत्र होत आहे.