टाव्हरेवाडीत शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर भरपाईची मागणी
आंबेगाव :टाव्हरेवाडी येथे शेतावरील विजेच्या तारांचे एकमेकांशी घर्षण होऊउन लागलेल्या आगीत सुमारे १५ एकर क्षेत्रातील ऊस जळुन खाक झाला या मध्ये संबधित आठ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.टाव्हरेवाडीच्या चिंतामणी पाणी पुरवठ्याच्या विहिरी जवळ टाव्हरेवाडी हद्दीत आज सायंकाळी सहाच्या सुमारास कावळा विजेच्या तारवर बसला होता त्यामुळे विजेच्या तारांचे घर्षण होऊन शॉट सर्किट होऊन आगीचे लोळ शेतात पडले या आगीत बाबाजी ज्ञानेश्वर बांगर यांचा दोन एकर, रोहिदास बन्सी पोखरकर यांचा एक एकर, प्रकाश दगडू पोखरकर यांचा एक एकर, बजरंग दगडू पोखरकर यांचा दीड एकर, गणपत विठोबा पोखरकर यांचा एक एकर, रंजना अशोक थोरात यांचा तीन एकर, बबन अहिलू बांगर यांचा दीड एकर, संतू गणाजी बागर यांचा चार एकर असा एकूण १५ एकर क्षेत्रातील उऊस आगीत भक्ष्यस्थानी पडला.सोळा एकर क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचवण्यात वाचविण्यात यश आले.