संविधान वाचनाचे बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
कोल्हापूर: जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीने गेली 7 दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. 26 जानेवारीच्या दिवशी एक हजार एकशे आकरा विद्यार्थ्यांनी सलग 7 दिवस 4 तास संविधान महावाचन करून संविधान महावाचनाचा सप्ताह पूर्ण केल्याने याची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. यावेळी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातील 1111 विद्यार्थ्यांनी संविधान महावाचनाचा विक्रम नोंदविला आहे. गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डी. एस. घुगरे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. संविधान वाचनाबद्दल आवड निर्माण व्हावी व संविधान सर्वांना समजावं यासाठी याचा आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते. सर्वांना एकच पोशाख देण्यात आलेला होता.
