केंद्रीय पथक पाहणी ,पाहणी करण्यापूर्वी माध्यमांची अधिकाऱ्यांना गराडा
पुणे :पुण्यात जिथून जीबीएसचा फैलाव झाल्याचा आरोप होतोय त्याच नांदेड पाणी पुरवठा विहिरीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक येताच मोठा गोंधळ उडाला.
निम्मे पथक मधूनच पळून गेलं.पण गावकऱ्यांनी तिथच रास्ता रोको केल्याने अखेर केंद्रीय पथकातील एक महिला सदस्या कशाबशा विहिरापर्यंत आल्या.पण तिथंही मीडियाचा गराडा आणि चमको मंडळीचा गोंधळ सुरूच होता.अखेर त्या गडबड गोंधळातच केंद्रीय पथकांच्या महिला डॉक्टर सदस्यांनी गावकऱ्यांचं म्हणणं एकूण घेतलं…पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय पथकाने सिंहगड रोड परिसरात नांदेड गाव येथे असणाऱ्या विहिरीची पाहणी करत गावकऱ्यांशी संवाद साधला.आज शहरातील हॉस्पिटलसह परिस्थितीचाही पथकाने आढावा घेतला.
जीबीएसची रुग्णसंख्या आणि त्यांच्यावरील उपचारांची माहिती या पथकाने स्थानिक आरोग्य यंत्रणांकडून घेतली आहे. त्यानंतर पथकातील सदस्यांनी विहिरीची पाहणी केली गावकऱ्यांच्या समस्या ऐकल्या.या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू),पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे. एनआयव्ही’चे तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करीत असून,आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि राज्याबरोबर समन्वय साधून काम करत आहे.पथकाने पाहणी केली मात्र आम्हाला या विहिरीच्या बाबतीत ठोस उपाययोजना हव्या आहेत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.