• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपत दादा बारस्कर

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0

दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये काव्य संमेलन, लोक जागर साहित्य यात्रा, साहित्य दिंडी,शाहिरी जलसा

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांसह मान्यवरांना सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सामावून घेण्यात येईल आणि साहित्यिकांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, आत्तापर्यंत झालेल्या संमेलनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम सोळाव्या संमेलनातून होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपत दादा बारस्कर यांनी केले.
सावेडी येथील निवासस्थानी स्वागताध्यक्ष निवड झाल्याबद्दल संपत दादा बारस्कर यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते, शब्दगंध चे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, शाहीर अरुण आहेर, संस्थापक सचिव सुनील गोसावी,सुभाष सोनवणे, प्रा डॉ तुकाराम गोंदकर, नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बबनराव गिरी, प्रा.डॉ.अनिल गर्जे, कवयित्री शर्मिला गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बारस्कर म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा आहे,या परंपरेत भर घालण्याचे काम आजच्या पिढीच साहित्य करत आहे. साहित्यिकांचा मान सन्मान करणे, त्यांना लिहिते करणे, त्यांना कलागुणांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य असून त्या दृष्टिकोनातून शब्दगंध संमेलनात चांगले काम आपण करू. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील साहित्यिकांनाही यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये काव्य संमेलन, लोक जागर साहित्य यात्रा, साहित्य दिंडी,शाहिरी जलसा, उद्घाटन समारंभ, एकपात्री प्रयोग, दोन काव्य संमेलन, परिसंवाद चर्चासत्र, कथाकथन, मराठी, हिंदी, उर्दू गजल संमेलन, पुरस्कार वितरण व समारोप समारंभ होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांशी या माध्यमातून संपर्क करण्यात येत आहे. साहित्याची आवड असणाऱ्या रसिकांनी आठ आणि नऊ फेब्रुवारी ही तारीख या कार्यक्रमासाठी राखीव ठेवावी. असे आवाहनही त्यांनी केले
यावेळी राजेंद्र चोभे,प्रा.डॉ.रमेश अबदार, हर्षल आगळे, संदीप गोसावी,प्रसाद भडके, ऋषिकेश राऊत, ऋता ठाकूर, सुरेखा घोलप, हर्षल गिरी, अनेक मान्यवर उपस्थित होते.
शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, राज्य संघटक प्रा डॉ अशोक कानडे,कोपरगाव तालुका शाखेच्या अध्यक्षा सौ ऐश्वर्याताई सातभाई, शेवगव चे हरीभाऊ नजन, पाथर्डी चे डॉ. राजकुमार घुले, नेवासा चे प्रा डॉ किशोर धनवटे यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

गंपू च्या गोष्टी’ बालकथा संग्रहाला राज्यस्तरीय शब्दगंध बालसाहित्य पुरस्कार जाहीर

Next Post

सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन 9 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर मध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved