• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

बहुजनांच्या हक्कांसाठी ‘बसप’ची ताकद वाढवा! मायावती जी यांचे देशभरातील पदाधिकाऱ्यांना आदेश

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in देश विदेश
0

बहुजनांच्या हक्कांसाठी ‘बसप’ची ताकद वाढवा!

मायावती जी यांचे देशभरातील पदाधिकाऱ्यांना आदेश

प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादीची बैठकीला उपस्थिती

पुणे:-देशातील बहुजनांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आणखी बळ द्या.तळागाळातील शोषित, पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्ष संघटन बळकट करा, असे आदेश बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा,उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांनी दिले.राजधानी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या पक्ष संघटनेच्या बैठकीत त्यांनी देशभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले, अशी माहिती पक्षाचे राज्य महासचिव,पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.३१) दिली. बैठकीत देशभरातील वरिष्ठ पदाधिकारी, प्रदेश अध्यक्ष आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.देशात वाढत असलेली आर्थिक विषमता,जातिवाद आणि सांप्रदायिकतेवर मा.बहनजींनी चिंता व्यक्त केली.भांडवलशाही धोरणांमुळे गरीब, बहुजन समाजाचे शोषण होतेय. सामाजिक,आर्थिक विषमता त्यामुळे वाढत असल्यावर बहनजींनी चिंता व्यक्त केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचे बीएसपीचे मुख्य उद्दिष्ट आहे.कॉंग्रेस,भाजप, समाजवादी आणि इतर पक्षांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानूसार बहुजनांना त्यांचा हक्क दिला असता तर, बहुजन समाज पक्ष स्थापन करण्याची गरजच पडली नसती, असे सुश्री बहनजी यांनी बैठकीतून स्पष्ट केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

बहुजनांना केवळ दिखाव्यासाठी जवळ करण्याची नीती या पक्षांची आहे. पंरतु,खऱ्या अर्थाने बहुजनांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करण्याचे काम या पक्षांनी केल्याचे ठाम मत बहनजींनी व्यक्त केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.धनाढ्य, भांडवलदारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या या पक्षांमुळे गरीब, दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय त्यांच्या घटनात्मक हक्कांपासून वंचित आहेत.बहुजन चळवळ कमकुवत करण्यासाठी पक्ष फोडण्याचे काम या पक्षांकडून केला जावू शकतो. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवणे, नेत्यांबद्दल अपप्रचार या पक्षांकडून केला जावू शकतो. नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल आकास निर्माण करण्याचे तसेच बहुजन समाजाला गोंधळात टाकण्यासाठी षडयंत्र देखील हे पक्ष करण्याची शक्यता आहे. पंरतु, या सर्व साम-दाम-दंड-भेद नितीपासून वाचण्याचे आवाहन मायावती जी यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

संघटन शक्ती, कॅडर विस्तार तसेच आगामी ​निवडणुकांच्या तयारीचा बैठकीतून मा.राष्ट्रीय अध्यक्षांनी आढावा घेतला. मुळे तत्वांवर कायम राहून, कुठल्याही दबावाखाली न येता बहुजनांच्या हक्कांसाठी लढाण्याकरीता तन-मन-धन समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन बैठकीतून मायावतीजींनी केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.तरुणांचा सहभाग, संघटनात्मक सुधारणा आणि आगामी निवडणुकीत चांगले प्रदर्शन करण्यासाठी रणनीती आखण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.बसप भांडवलशाहीवर आधारीत नसून कॅडर आधारित पक्ष असल्याचे बहनजींनी स्पष्ट केले.बैठकीचा समारोप बहुजन चळवळीला अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत पार्टीच्या प्रदर्शनात सुधारणा करण्याच्या निर्धारासह झाल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

Previous Post

महादेव’च्या या नवीन मोशन पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता

Next Post

अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील पहिल्याच प्रोजेक्टचा मुहूर्त संपन्न, अभिनेत्री सुरभी सोबत चित्रीकरणाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved