आणि त्या रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटले स्मितहास्य…ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबी आजाराचे पाच रुग्णांचा डिस्चार्ज..पहा काय म्हणाले रुग्ण
पुणे:- पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहे.शहरात या आजाराचे १४९ संशयित रुग्ण आढळून आले आहे तर तीन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झालं आहे.यामुळे शहरात चिंतेचा वातावरण निर्माण झालं आहे.मात्र अस असलं तरी आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबी आजाराचे पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आलं.यावेळी या रुग्णांना फुलांचा पुष्पगुच्छ देत,पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आलं आहे.यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
पुण्यातील ससून रुग्णालय येथे जोबीएस रुग्णांचे २८ रुग्ण असून आज पाच रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले.यावेळी अधीक्षक डॉ.यलप्पा जाधव,डॉ.रोहिदास बोरसे,डॉ. एच.बी.प्रसाद हे उपस्थित होते.ससून मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहे.यावेळी रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.