विधवा महिलांना पूर्णांगिनी म्हणून सन्मान दिला पाहिजे : रूपाली चाकणकर
चांबळी येथे मीना शेंडकर व अंजना कामठे यांचा पीएचडी सन्मान सोहळा
सासवड: पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु त्या न डगमगता संसाराचा गाडा कष्टाने पुढे नेतात. यापुढे विधवा महिलांना पूर्णांगिनी म्हणून सन्मान दिला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकांनी पुढे येऊन रूढी, परंपरा यांना फाटा देत स्त्री सबलीकरणाच्या लढ्याला साथ दिली पाहिजे. तसेच विधवा महिलांना सन्मानपुर्वक वागणूक द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.चांबळी ( ता. पुरंदर ) येथे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी डॉ. मीना दत्तात्रय शेंडकर व डॉ. अंजना विशाल कामठे यांनी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून डॉक्टरेट पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने रूपाली चाकणकर यांच्या हस्ते नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी चाकणकर बोलत होत्या.