यंदा देशातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी
नाशिक -सुला विनियार्ड्सच्या १४ व्या सुला फेस्टला नाशिकमध्ये सुरुवात झाली तब्बल ५ वर्षानंतर नाशिकमध्ये सुला फेस्ट होतोय.
यंदाच्या सुला फेस्टचं वैशिष्टय म्हणजे यंदा पहिल्यांदाच आतंरराष्ट्रीय संगीत बँड ऐवजी देशातील कलाकारांना सुला फेस्टमध्ये परफॉर्म करण्याची संधी देण्यात आलीय.
सुला फेस्टच्या दोन्ही दिवस भारतीय कलाकारांचे बँड परफॉर्म करत आहेत. भारतीय कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुलाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. पहिल्या दिवशी या फेस्टमध्ये भारतीय बँडस्ने सादरीकरण करायला सुरुवात केल्यानंतर संगीतप्रेमींनी या संगीताच्या तालावर ठेका धरत नाचणं एन्जॉय केलं.
संगीतप्रेमींनी त्यांच्या संगीताच्या तालावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला. दिवसभरात अनेक कलाकारांनी या ठिकाणी आपली कला सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. तर सुला विनयार्ड्स ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट्स, स्थानिक साध्या आणि आकर्षक सजावटीने पर्यटकांना भुरळ घातलीय. त्यामुळे जगभरातून पर्यटक या ठिकाणी दाखल झाले असून सुला फेस्टची उत्सुकता शिगेला पोहचलीय..