- इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड सोबतच सार्वजनिक मतदानाने ‘युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ्स’ला दिला अनोखा रंग
पुणे – आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कौन्सिल आणि इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यंग शेफ ऑलिम्पियाडच्या अंतर्गत ‘युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ्स’ (UWYC) अभिनव उपक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले. स्पर्धात्मक नसलेला हा कार्यक्रम ५० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो, जिथे ते आपापल्या देशांचे पारंपरिक पदार्थ सादर केले जातात.
‘युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ्स’ (UWYC) हा मैत्री व ऐक्याचा उत्सव आहे, जिथे यंग शेफ ऑलिम्पियन्सना चुरशीच्या स्पर्धेच्या दरम्यान एकजुटीचा अनुभव घेता येतो. यावर्षीच्या कार्यक्रमात एक नवा ट्विस्ट जोडण्यात आला—राष्ट्रीय पदार्थांसाठी सार्वजनिक मतदानाचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण जगाला सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय पदार्थ ठरविण्याची संधी मिळाली. या या सोहळ्यात सन्मानित पुण्यातील विविध पंचतारांकित हॉटेल्सचे प्रतिष्ठित शेफ व्यक्तिमत्त्वे उपस्थित होते.
इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयआयएचएम) आणि यंग शेफ ऑलिम्पियाड (वायसीओ) चे अध्यक्ष डॉ. सुबोर्णो बोस यांनी सांगितले, “युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ्स हा केवळ पाककला पुरता मर्यादित कार्यक्रम नाही, तर तो पाककलेच्या माध्यमातून इतर राष्ट्रांना जोडणाऱ्या सामर्थ्याचा पुरावा आहे. हे कलिनरी डिप्लोमसीचे सर्वोच्च शिखर आहे.”
इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) पुण्याचे संचालक रुपिंदर खुराना म्हणाले, “पुण्यातील एका भव्य संध्याकाळी ‘युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ्स’ (UWYC) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला, ज्याने हे सिद्ध केले की पाककला ही लोकांना जोडणारे आणि आनंद साजरा करण्याचे प्रभावी माध्यम आहे.”
स्पर्धेच्या मुख्य फेऱ्या ३ फेब्रुवारीपासून इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) कॅम्पस किचनमध्ये, गोव्यात सुरू झाल्या. ४ फेब्रुवारीपासून दिल्ली, पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे पुढील फेऱ्या पार पडतील. दोन फेऱ्यांतील गुणांवर आधारित १० सर्वोत्तम शेफ कोलकाता येथे ८ फेब्रुवारी २०२५ रोजी यंग शेफ ऑलिम्पियाड (YCO) २०२५च्या ग्रँड फायनलमध्ये सहभागी होतील.
याशिवाय, ‘प्लेट ट्रॉफी’ आणि ‘डॉ. सुबोर्णो बोस कलिनरी इंटरनॅशनल चॅलेंज’ पुरस्कार देखील प्रदान केले जातील. या जागतिक मंचावरील प्रत्येक विजेतेपद हे युवा शेफच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेणारे ठरेल आणि त्यांच्या कौशल्याची जागतिक स्तरावर पुष्टी करेल.