इयत्ता आठवी ते दहावी चे विद्यार्थी सहभागी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या 8 व्या आवृत्तीचे थेट प्रक्षेपण माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मोदी यांनी इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना विविध टिप्स दिल्या. सर्वप्रथम निरोगी राहणे महत्त्वाचे सांगताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक टिप्सही दिल्या आहेत. आजच्या कार्यक्रमातून अभ्यास आणि आरोग्याच्या संदर्भातील सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी केल्यास याचा निश्चितच परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल असं इयत्ता १० वी मधील विद्यार्थिनी केया गोखले हिने सांगितलं. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक अक्षय कुलकर्णी , प्रिया जोशी आणि मधुरा बापट यांनी याच्या संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.