केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार
मुंबई : काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या 95व्या वर्धापनदिना निमित्त येत्ता 2 मार्च 2025 रोजी नाशिक येथे भव्य बौध्दधम्म परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.या बौध्दधम्म परिषदेच्या पूर्वतयारीसाठी मुंबई आणि परिसरातील बौध्दधम्म प्रसार चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते आणि बौध्द उपासकांची महत्वपूर्ण बैठक येत्या रविवार दि.16 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत टिळकनगर रेल्वे टर्मिनल समोर,सर्वोदय महाबुध्द विहार येथे आयोजित करण्यात आली आहे.पुज्य भदन्त राहुल बोधी महाथेरो अणि अनेक पुज्य भिक्खू उपस्थित राहणार आहेत.बौध्दधम्म् परिषदेच्या यशस्वीतेसाठीरिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे या बैठकीत प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीस मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बौध्द उपासकांनी आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केले आहे.