डॉ. प्रभाकर देसाई यांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांचा कार्यकाळ सोमवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी मुदत पूर्ण झाल्यामुळे बुधवारी दुपारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकपदाची धुरा कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता व मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपविली. कुलगुरु यांच्याकडून परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकपदाची जबाबदारी मिळाल्यावर प्रा. देसाई यांनी सदर पदाचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी विद्यापीठाचे प्र – कुलगुरू प्रा.डॉ . पराग काळकर , प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकारे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, आयक्यूएसी सेंटरचे संचालक डॉ.विनायक जोशी यांच्यासह परीक्षा विभागाचे सर्व उपकुलसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते.