– यूपीआयव्दारे अन्य बँकांतील निधीचा वापर करून गुंतवणूक करता येणार
पुणे – साउथ इंडियन बँकेने खातेदारांसाठी ‘एसआयबी क्विक एफडी’ ही नवीन ठेव योजना सादर केली आहे. बँकेच्या खातेदारांना त्यांच्या अन्य बँक खात्यांमधील निधी वापरून मुदत ठेवी (एफडी) उघडण्याची सुलभता ठेवीचा हा नवीन प्रकार प्रदान करतो. ग्राहकांना युपीआय वापरून डिजिटल पद्धतीने या एफडीमध्ये गुंतवणूक करता येत असल्याने हा ठेव प्रकार खातेदारांसाठी सुलभता त्याचबरोबर अनुकूलता वाढवतो.
ग्राहकांना सोपे, सुटसुटीत आणि कार्यक्षम डिजीटल बँकींग पर्याय प्रदान करत साउथ इंडियन बँक त्याव्दारे नवनवीन आविष्कार सादर करत आहे. तसेच ग्राहकांना अनुभवसंपन्नही बनवत आहे. एसआयबी क्विक एफडीमुळे मुदत ठेव अगदी झटपट करणे शक्य झाले असून ही प्रक्रिया अतिशय सुटसुटीत झाली आहे. वैध केवायसी असलेले ग्राहक युपीआयचा वापर करुन अगदी सहज मुदत ठेव सुरु करु शकतात. त्यामुळे पहिल्यापेक्षा ठेवींतील गुंतवणूक अधिक सुरक्षित झाली आहे.
प्रमुख वैशिष्ट्येः
· पुर्व खातेसंबंधाची गरज नाहीः साउथ इंडियन बँकेत बचत खाते नसले तरी ग्राहक ही मुदत ठेव सुरु करु शकतो.
· झटपट आणि कागदविरहित प्रक्रिया: संपूर्ण एफडी बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. त्यामुळे अवघ्या ५ मिनिटांत जलद आणि त्रासमुक्त गुंतवणूकची खात्री मिळते.
· युपीआय वापरून एफडीमध्ये निधी जमा करा: ग्राहक आपले युपीआय वापरून त्यांच्या मुदत ठेवीमध्ये निधी जमा करू शकत असल्याने ही प्रक्रिया आणखी सुटसुटीत झाली आहे.
· मोजक्या कागदपत्रांची गरजः फक्त पॅन आणि आधार तपशील आवश्यक असल्याने एफडी सुरु करण्याची प्रक्रिया सुलभ होते.
· २४*७ उपलब्धता: या प्रक्रियेत लवचिकता असल्याने मुदत ठेव कधीही उघडता येतात.
· परवडण्यायोग्य गुंतवणूकीचा प्रवेश: मुदत ठेवी अवघ्या १,००० रुपयांपासून सुरू करता येत असल्याने या ठेवी अधिकाधिक लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
· आकर्षक परतावा: स्पर्धात्मक व्याजदरांसह मुदतपूर्व पैसे काढण्याची लवचिकता.
· सुरक्षित आणि विमा संरक्षण: मनाची शांती सुनिश्चित करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना DICGC विम्याअंतर्गत सुरक्षा कवच प्रदान करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी येथे भेट द्याः https://quickfd.southindianBank.com/