आरोपी दत्तात्रय गाडे, राहुल सोलापूरकर आणि डॉ. प्रशांत कोरटकर यांचे पिंडदान (शेणदान/अंडदान)
समाजवादी पक्षातर्फे समाजाला घातक असलेल्या नीच प्रवृत्तीचा शेणदान करत निषेध
पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्ये केली जात आहेत. समाजवादी पक्षाचे नेते, प्रदेश अध्यक्ष अबू असिम आझमी अनेक दिवस विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर याबाबत UAPA सारखा गंभीर कायदा करावा अशी मागणी करत आहेत. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसा कायदा अस्तित्वात येण्याची गरज आहे जेणेकरून महाराष्ट्रात फोफावत असलेल्या अशा प्रवृत्तीला आळा बसेल. राहुल सोलापूरकर आणि डॉ. प्रशांत कोरटकर हे … प्रवृत्तीची मुर्तीमंत उदाहरणे आहेत. कायदा तर झालाच पाहिजे त्याच बरोबर निच प्रवृत्तीच्या या दोघांवर सुद्धा तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आले.
“स्वारगेट एस.टी स्थानकावर” भगिनी सोबत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने पुणे शहरातील नागरिकांना शरमेने मान खाली घालायला लगाली आहे. या घटनेमुळे पुण्याचा लौकिक धुळीला मिळाला आहेच त्याच बरोबर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुणेकर नागरिक म्हणून या घटनेची लाज समाजवादी पार्टी पुणे शहर ला वाटते आहे. गुन्हेगारावर वचक बसवणारी कठोर कारवाई तर झालीच पाहिजे त्याच बरोबर ज्यांच्या लापरवाही मुळे हि घटना घडली त्या दोषींवर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी या गुन्हेगार व्यक्तीचे पिंडदान (अंडदान, शेणदान) करून निषेध करण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनामाची देखील मागणी करण्यात आली.