- मंगळवारी रंगणार ‘ नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ कार्यक्रम
पुणे : भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ. कवी, लेखक, कलाकार व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतिने अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ‘नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती सम्यक साहित्य संमेलन, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली.
‘नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ या अभिनव आंदोलनाबद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले, मंगळवार दि . ४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दंगलकार नितीन चंदनशिवे, सुमित गुणवंत, सागर काकडे, हृदमानव अशोक, रमणी सोनवणे, अशोक घोडके, स्वप्नील चोधरी, हर्षनंद सोनवणे, रवी कांबळे, जित्या जाली, देवा झिंजाड, विठ्ठल गायकवाड, म.भा. चव्हाण, विजय बडेवार, अंजली कुलकर्णी, सुरेश वैराळकर आकाश सोनवणे यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कवी, पत्रकार सहभागी होऊन नामदेव ढसाळ यांच्या कविता आणि लेखनांचे वाचन करणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.
डॉ. बासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव दिपक म्हस्के, डॉ. राजाभाऊ भैलुमे, प्रा. किरण सुरवसे, डॉ. निशा भंडारे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, डॉ. स्वप्निल गायकवाड, प्रा. रमा करोते-सुर्यवंशी आदि यं अभिनव आंदोलनाचे निमंत्रक आहेत.