• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Wednesday, March 4, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

मातृनाम प्रथम” कार्यक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विद्यार्थी व पालक यांच्याहस्ते विशेष सत्कार

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in धार्मिक
0

जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने “मातृनाम प्रथम” या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, प्रतिनिधी – राज्य शाशनाने ११ मार्च २०२४ महिन्यात महिला दिनाच्या निमित्तानं चौथं महिला धोरण लागू केलं. त्याअंतर्गत महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत झालेल्या बैठकीत शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आले. मात्र पुण्यातील यशवंत क्लासेसच्या वतीने मातृनाम प्रथम हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु करण्यात आला होता. दरवर्षी जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने यशवंत क्लासेस यांच्यावतीने “मातृनाम प्रथम” या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या या उपक्रमाच्या पाचव्या वर्षी “मातृनाम प्रथम” कार्यक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विद्यार्थी व पालक यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार, १७ मे रोजी सकाळी ७:३० वाजता सातारा रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यशवंत क्लासेसचे संचालक प्रा. शीतल पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि यशवंत क्लासेस बालाजी नगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होत आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि यशवंत क्लासेसचे ब्रँड अँबेसिडर संकर्षण कऱ्हाडे त्यांच्या “आई” या कवितेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांशी आई विषयी हितगुज करणार आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थितीत असणार आहे.

शीतल पाटील म्हणाले की, आईला अविस्मरणीय भेट देण्यासाठीचा विशेष कार्यक्रम म्हणजे “मातृनाम प्रथम” यशवंत क्लासेस चे विद्यार्थी या दिवशी आपल्या नावामध्ये आईचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव असा बदल करून आपले नाव, सोशल मीडियावरचे नाव हे सर्व बदलतात आणि आपल्या आईला मी भरपूर अभ्यास करून माझ्या करिअरचा स्वराज्य निर्माण करेल आणि तुझं नाव लावून अभिमानाने मिरवेल अशा आशयाची शपथ ग्रहण करतात. या शपथविधी सोहळ्याला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत. आईच्या नावाची व तिच्या कामाची दखल सरकार तर्फे देखील घेण्यात आल्यामुळे व अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य झाल्यामुळे आमचे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक आणि माता अजितदादांच्या अभिनंदनचा ठराव मांडणार आहेत. याच कार्यक्रमांमध्ये यशवंत क्लासेसचे ब्रँड अँबेसिडर संकर्षण कऱ्हाडे त्यांच्या “आई” या कवितेमुळे सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि विद्यार्थी आणि मातांच्या हृदयात पोहोचलेले आहेत. ते आपली कविता सादर करणार असून विद्यार्थ्यांबरोबर आई या विषयाशी संबंधित हितगुज करणार आहेत.

आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे.

Previous Post

कांबळे उर्फ “लॅपटॉप” अखेर अटकेत पुणे दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

Next Post

सर जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे काम गतीने पूर्ण करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved