पुणे : शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळले आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहर, ग्रामीण भागामध्ये गुलीयन बॅरी सिंड्रोम आजाराचे रुग्ण मागील काही दिवसात आढळले आहेत.आणि आता ही संख्या वाढतच चालली आहे.पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसर व धायरी येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. यासंदर्भात महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ.भोसले म्हणाले, “संबंधित आजार नेमका कशामुळे होतो, याबाबतची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. मात्र संबंधित आजार हा रोगप्रतिकारक शक्ती स्नायुंवर हल्ला करते. संबंधित आजाराचे पुणे महापालिकेच्या हद्, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तसेच ग्रामीण काही रुग्ण आढळले आहेत.मात्र आता यात वाढ होऊन 67 वर ही संख्या गेली आहे.
गिलेन बॅरी सिंड्रोम आजाराची सर्वसाधारण लक्षणे
– हात व पायातील ताकद कमी होणे
– हातापायाला मुंग्या येणे
– अन्न सेवन करण्यास व बोलण्यास त्रास होणे
– धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे
काळजी काय घ्यावी?
-पाणी पिण्याआधी उकळून घ्या.
-भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा.
– चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा.
– अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका.
– जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा.
खाण्याचे भांडे अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाणघेवाण करू नका.
– कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा.
– स्वयंपाकघराचा ओटा आणि भांडी निर्जंतूक करून घ्या.