• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Wednesday, August 6, 2025
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Wednesday, August 6, 2025
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
Home कृषी

कचऱ्यातून फुलवले सुंदर व हिरवेगार टेरेस गार्डन

The Dhakka by The Dhakka
May 1, 2025
in कृषी
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sai seva साई जनसेवा प्रतिष्ठान व कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा संयुक्त उपक्रम

पुणे: ओला कचरा, किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपाला यातून पर्यावरणपूरक असे सुंदर व हिरवेगार टेरेस गार्डन कात्रज परिसरात फुलले आहे. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर साई जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून ८०० चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे. या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आहेत. फळा-फुलांचा बहर आला असल्याने ही बाग अतिशय सुंदर दिसत आहे.

Terrace gardenसाई जनसेवा प्रतिष्ठान व कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेल्या या बागेचे उद्घाटन बुधवारी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते झाले. प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपयुक्त जयंत भोसेकर, क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, “टायर, ड्रम, विटा यांसारख्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून बनवलेली ही बाग खूपच सुंदर झाली आहे. फळे, फुले आणि भाजीपाला तयार होतानाच, स्वच्छ प्राणवायू निर्माण होत आहे. घरातला ओला कचरा या बागेत जिरवला जात आहे. त्यामुळे कचरा कमी होणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी याचे अनुकरण करावे. आपल्या परसबागेत, गच्चीवर अशी छोटी बाग फुलवावी आणि त्यात टाकाऊ वस्तू आणि ओला कचरा जिरवावा. फक्त सुका कचरा पालिकेकडे प्रक्रिया करण्यासाठी द्यावा. प्रत्येकाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर कचऱ्याचे विकेंद्रीकरण होऊन शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल. शिवाय अशा भागांमधून आरोग्यदायी, भाजीपाला फळे उपलब्ध होतील. जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. असा पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यासाठी पुणे महानगरपालिका नेहमीच प्रोत्साहन देईल एवढ्या सुंदर उपक्रमासाठी साई जनसेवा प्रतिष्ठान व आमच्या क्षेत्रीय कार्यालयाचे अभिनंदन करतो.”

गीता मोहोरकर म्हणाल्या, “महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरातील सिंहगड रस्ता, धनकवडी-सहकारनगर आणि कोंढवा-येवलेवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर ओल्या कचऱ्यापासून बाग तयार करण्यात आली आहे. केवळ ओला कचरा जिरवून त्यात झाडे लावण्यात आली आहेत. दोनशे लिटरच्या १६० ड्रममध्ये ही झाडे लावण्यात आली असून, यामध्ये रोज ६०० ते ७०० किलो ओला कचरा जिरवला जात आहे. टाकाऊ ड्रमचा वापर करून त्यापासून बसण्यासाठी खुर्च्याही तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे कमी जागेत, कमी वेळेत आणि कमी खर्चात ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन शक्य झाले आहे. नागरिकांनी आपल्या घरी, सोसायटीमध्ये अशा बागा फुलवल्या, शहरातील कचऱ्याची वाढती समस्या आटोक्यात येण्यास निश्चित मदत होईल.”

सुरज लोखंडे यांनी सांगितले की, साई जनसेवा प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षापासून शहराच्या विविध भागात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण संवर्धन, तसेच महिला व युवक-युवतींकरिता विविध उपक्रम राबविले जातात. मुखत्वे कचरा व्यवस्थापन विषयक उपक्रमही राबविले जातात.

ShareSendTweet
Previous Post

हडपसर मध्ये जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटन

Related Posts

कृषी

ऊस तोडणी मशीन मालकांचा ठिय्या आंदोलन सुरू

March 10, 2025
कृषी

देवराईमुळेच जैवविविधता टिकून – डॉ. माधव गाडगीळ

February 27, 2025
कृषी

ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा फायदा घेऊनही भरावे लागणार लाईटबिल

February 17, 2025
कृषी

कोथरूड येथे 20 फेब्रुवारी पासून संत्रा महोत्सवाला सुरुवात पुणे: पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार

February 17, 2025
कृषी

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या १०० व्या जयंती निमित्त उलगडला संघर्षमय, राजकीय व सामाजिक प्रवास

February 14, 2025
कृषी

शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी तुलना करणाऱ्या कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध: किसान सभा

February 14, 2025
Load More

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

दीपक टिळक यांचे निधन.. अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली

July 16, 2025

पौड पोलिसांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप कारवाईची मागणी कारवाईची मागणी

July 16, 2025

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला

June 9, 2025

यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी

June 9, 2025

डॉ. राधाकिशन पवार यांची बदली कुष्ठरोग उपसंचालक पदावर– कार्यकाळ संपण्‍याआधीच बदली

June 9, 2025

Popular News

  • शिवदुर्ग दर्शन समितीची किल्ले रोहिडा मोहीम जल्लोषात

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Untitled (2)
  • आरोग्य (25)
  • कृषी (19)
  • क्राईम (20)
  • क्रीडा (23)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (39)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (89)
  • राजकारण (43)
  • राज्य (92)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Go to mobile version