पुणे:- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी काल जागेच्या वादातून दोन नागरिकांना मारहाण केली होती आणि त्याचं व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.आत्ता या प्रकरणी चांदेरे यांच्या विरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
माजी नगरसेवक बाबुराव चांदरे यांनी विजय रौंदळ आणि प्रशांत जाधव यांना काल मारहाण केली होती यात डोक्याला गंभीर दुखापत विजय रौंदळ डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या प्रकरणी प्रशांत जाधव यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र बाबुराव चांदेरे हे अजित पवार यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही तसेच प्राण घातक खाल्ला करूनही पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रशांत जाधव यांनी केला आहे
कोण आहेत बाबुराव चांदेरे….
बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख असून पुण्यातील बावधन , पाषाण भागात राष्ट्रवादीचे काम पाहतात. पक्षाने २०१२ साली त्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही दिल होत सध्या ते राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक आहेत. बारामतीत भरवलेल्या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनात पण ते होते यावेळी कोचला ही शिवीगाळ त्यांनी केली होती.तसेच रिक्षा आडवी आली म्हणून रिक्षावाल्याला मारहाण केली होती.