डीएसपी म्युच्युअल फंडातर्फे गुंतवणूकदारांसाठी डीएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड योजनेचा शुभारंभ :
पुणे: डीएसपी म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी डीएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड ही नवीन गुंतवणूक योजना आणल्याची घोषणा केली आहे. हा फंड मुदतमुक्त श्रेणीतील असून तो निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकाआधारे आपली वाटचाल करणार आहे. खासगी बँकिंग क्षेत्रातील समभागांत गुंतवणूकीवर हा फंड प्रामुख्याने आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.
बँकिंग क्षेत्राबद्दल आशावादी दृष्टीकोन असलेले गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू शकतात. निर्देशांकात सुमारे ८० टक्के वाटा असलेल्या चार सर्वात मोठ्या खासगी बँकांच्या समभागांमध्ये गुंतवणूकीची संधी या खास दृष्टीकोनामुळे मिळते. निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकात मोठ्या बँकांचे झालेले केंद्रीकरण ही एक लाभाची बाजू असू शकते, अशी डिएसपीची धारणा आहे. ग्राहक अन्य लहान समकक्ष बँकांपेक्षा मोठ्या बँकांवर विश्वास ठेवतात आणि त्यांना प्राधान्य देतात. या धारणेमुळे कर्जवितरणात उच्च वाढ, भांडवलाची सहज उपलब्धता आणि मोठी आर्थिक उलाढाल आदी बाबींमुळे या मोठ्या बँकाना टिकून राहता येते, तसेच आणखी वृध्दी साध्य करता येते.
गेल्या दोन दशकात भारतीय खासगी बँकांचा बाजारातील हिस्सा दुप्पट झाला आहे. * या बँकांनी २००१ पासून अतिशय जोरदार कामगिरी करताना त्यांचे ताळेबंदपत्रक अतिशय भक्कम राखताना नफ्यातही सातत्य राखले आहे**. परंतु निफ्टी फिप्टी या निर्देशाकांच्या तुलनेत गत काही वर्षात खासगी बँकांच्या समभागांनी तुलनात्मक
दृष्टीकोनातून काहीशी निराशाजनक कामगिरी केलेली आहे. त्यांचे सध्याचे मूल्यांकन दहा वर्षाच्या सरासरी पातळीच्याही खाली घसरलेले आहे. त्यामुळे येथून उसळी घेण्यासाठी हे क्षेत्र एक गट म्हणून सज्ज असल्याचे दिसत आहे.
निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये मोठ्या बँकांचे झालेले केंद्रीकरण ही फायदेशीर बाब ठरु शकते, अशी आमची धारणा आहे. ग्राहकांचा विश्वास, भांडवलाची सहज उलपब्धता आणि आर्थिक व्यवहारांचे मोठे प्रमाण यामुळे भारतातील प्रमुख बँका जागतिक पातळीवरील प्रवाहांप्रमाणेच सातत्यपुर्ण वाढ दाखवू शकतात. हा फंड गुंतवणूकदारांना भारताच्या खासगी बँकिंग क्षेत्राच्या भविष्यकालीन वाढीमध्ये सहभागी होण्यासाठी एक सुव्यवस्थित दृष्टीकोन प्रदान करतो, अशी टिप्पणी डीएसपी म्युच्युअल फंडाचे सीएफए आणि पॅसिव्ह इनव्हेस्टमेंट अँड प्रॉडक्टस विभागाचे प्रमुख अनिल घेलानी यांनी केली.
खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये थेट गुंतवणूकीऐवजी डीएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड खासगी बँकींग क्षेत्रात अतिशय करसक्षम पध्दतीने गुंतवणूकीची मार्ग प्रदान करतो. कारण म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून या क्षेत्रात गुंतवणूक केल्यानंतर समभागांत फेरसंतुलन साधले असता अथवा प्राप्त होणाऱ्या लाभांशावर भांडवली नफा कर लागू होत नाही. त्याचबरोबर विविध निर्देशांकांतील घटकांचे सध्याचे मूल्यांकन हे त्यांच्या सरासरी पातळीपेक्षाही खाली आहे. त्यामुळे गुंतवणूदारांना या समभागांत प्रवेश करण्याची आकर्षक संधी प्रदान झालेली आहे, असे मत डीएसपी म्युच्यूअल फंडाचे फंड व्यवस्थापक दिपेश शहा यांनी व्यक्त केले.
डिएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड योजनेची ऑफर (एनएफओ) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गुंतवणूकीसाठी खुली आहे. आपल्या वित्तीय उद्दीष्टांच्या अनुरुप गुंतवणूकदार या फंडात एकरकमी अथवा नियमित गुंतवणूक योजना अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकणार आहेत.