- विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान सोहळाआमदार हेमंत रासनेंच्या संकल्पनेतून हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडणार भव्य सोहळा
- आमदार हेमंत रासनेंच्या संकल्पनेतून हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडणार भव्य सोहळा
पुणे : आजच्या युगामध्ये पुरुषांच्या खांद्यालाखांदा लावून महिला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अशाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी १० हजारांच्यावर महिला उपस्थित राहणार असून भव्य हळदीकुंकू कार्यक्रम देखील पार पडणार आहे.
आमदार हेमंत रासने आणि सौ. मृणाली रासने यांच्या संकल्पनेतून गेल्या १० वर्षांपासून या कार्यक्रमाचे अखंडित आयोजन करण्यात येत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदानावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव योगीता भोसले, विश्वकप विजेता महिला खो-खो संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर, पत्रकार मीनाक्षी गुरव, समाजसेविका शर्मिला सय्यद आणि साहित्य क्षेत्रासाठी वसुंधरा काशीकर, आंतरराष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.