निवृत्तीबद्दल कृतज्ञता समारंभाचे पुण्यातील घोरपडी येथील महासैनिक लाॅन्स येथे आयोजन
पुणे: पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे अधीक्षक अभियंता अनिल शामराव ढेपे यांच्या सेवा निवृत्तीबद्दल कृतज्ञता समारंभाचे पुण्यातील घोरपडी येथील महासैनिक लाॅन्स येथे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.आजी माजी शासकीय अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या वतीने राजमुद्रेची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन ढेपे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सा.बां.विभागाचे निवृत्त सचिव म.वा.पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे,एमएसआयडीसीचे सहसंचालक तथा सचिव डाॅ.विकास रामगुडे,पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर ,सेवानिवृत्त मुख्य अभियंता अरुण देवधर,सा.बां.मंडळ पुणे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर,निवृत्त विभागप्रमुख शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संभाजीनगर डाॅ.उमेश कहाळेकर,जसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे,निवृत्त सचिव दत्तात्रेय ठुबे,सा.बां.नाशिकचे अधीक्षक अभियंता किशोर पाटील यांच्यासह आजी माजी शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले कि,एखादा सहकारी किती ताकदीचा असतो याचे उदाहरण म्हणजे अनिल ढेपे आहे.टाकलेला विश्वास आणि बारकाव्यांसह कामे केली.सामाजिक चळवळीसह मातृतिर्थ उभारणीत योगदान दिले.उत्तमोत्तम निर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा आहे असे गौरवोद्गार खेडेकर यांनी काढले.
म.वा. पाटील म्हणाले कि,प्रशासकीय कारकिर्दीत अनेकांना सहकार्य केल्याने ढेपे यांचा लोकसंग्रह मोठा आहे.सध्या कार्यरत असलेल्या अधिका-यांनी त्यांच्या कामापासून धडा घ्यावा.
सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनिल ढेपे म्हणाले कि, शहरात काम केले असले तरी मुळ गाभा हा ग्रामीण संस्कृतीचा आहे त्यामुळे सर्वांगीण विकास होत गेला.ग्रामीण भागात काम करणे हा एक वेगळाच अनुभव असतो.शिवशंभुंच्या स्वराज्यातील बारा मावळच्या भुमीत काम करायला मिळाले हे भाग्य समजतो.शासनाने संधी दिल्यानेच मला मिळालेल्या संधीला न्याय देता आला.सरकारी कामात रस्त्यासोबतच माणसं जोडता आली.येसाजी कंक यांच्या गावाला जोडणारा दुर्गम रस्ता रोजगार हमी योजनेतून पुर्ण केला.अनेक मोठ्या नेत्यांच्या आणि अधिका-यांच्या सानिध्यात काम करायला मिळाले त्यामुळेच मी घडलो आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देता आले याचे मोठे समाधान आहे.
माजी अधीक्षक अभियंता धनंजय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.आभारप्रदर्शन सुनिल सोळुंके यांनी केले.