हडमथसिंग राजपूरोहित याची बनावट नोटा बनवणे बाळगणे आणि चलनात आणणे या आरोपातून निर्दोष मुक्तता….
पुणे :- सहा वर्षापूर्वी दरोडा विरोधी पथकाच्या माध्यमातून बनावट चलनी नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या हडपतसिंग बाबू सिंग राजपुरोहित याची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सन 2019 साली दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांनी एका आरोपीस बनावट चलनी नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असताना अटक केलेली होती आणि या प्रकरणी तपास करत असताना त्यांनी हडपतसिंग बाबू सिंग राजपुरोहित याला बनावट चलनी नोटा बनवणे बाळगणे आणि चलनात आणणे या आरोपात अटक केली होती.अटक झाल्या पासून तो न्यायालयीन कोठडीत बद्ध होता.आणि आरोपीने वेळोवेळी केलेले जामीन अर्ज न्यायालयाने नाकारलेले होते. मात्र आज आरोपीची आणि त्याच्यासोबत इतर सर्व आरोपींची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
आरोपींनी बनावट नोटा बनवल्या, बाळगल्या तसेच चलनात आणल्या याबाबत पोलिसांनी कोणताही विश्वासार्ह पुरावा न्यायालयासमोर दाखल केलेला नाही. या आरोपीच्या वतीने एडवोकेट संग्रामसिंह देसाई एडवोकेट हर्षवर्धन राजपुरोहित एडवोकेट अथर्व चाकणकर यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या अधिक न्यायिक दाखल्यांचा आधार घेत अभियोग पक्ष द्वारे केस मधील सर्व तथ्ये विश्वासार्ह रित्या न्यायालयासमोर मांडली नाहीत असा युक्तिवाद केला व सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयात दाखल केलेले पुरावे विश्वासार्ह नाहीत या सबब सबळ पुराव्याच्या अभावामुळे सर्व आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीयुत अजित एन मरे यांनी सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.याप्रकरणी आरोपीतर्फे वकिलांना ऋषिराज सिंग,अंशुमन सिंग राजपूरोहित, अझीम अन्सारी यांनी सहकार्य केले