दहा हजार यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता केस गळती साठी ला डेन्सिटी ची हडपसरमधील ऑमोनोरा पार्क येथे होणार नवीन शाखा
सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक यांच्या हस्ते होणार उद्घाटन-
पुणे : केस गळती ही आज केवळ सौंदर्याचा नव्हे, तर आत्मविश्वासाचा मोठा मुद्दा बनली आहे. La Densitaeमध्ये आम्ही फक्त हेअर ट्रान्सप्लांट करत नाही,तर लोकांचे आयुष्य बदलतो! ल तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने १०,००० हून अधिक यशस्वी ट्रान्सप्लांट्स केल्यानंतर दर गुरुवारी महिलांना मोफत सल्ला व मार्गदर्शन योजना तसेच नववी शाखा पुण्यातील हडपसर येथे सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती ला डेन्सिटी चे संस्थापक गजानन जाधव यांनी दिली आहे . अनेक लोकांनी स्वतःमधील बदल अनुभवलाय – केवळ लूकच नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीमध्ये!
आजही बरेच लोक केसांवर खर्च करणं म्हणजे लक्झरी समजतात, पण मी सांगू इच्छितो – स्वतःवर गुंतवणूक करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा एक उत्तम निर्णय ठरू शकतो.असे ते म्हणाले .
La Densitaeच्या उपचारांवर अनेक सेलिब्रिटींनी विश्वास दाखवला आहे, त्यांच्या प्रमाणेच, प्रत्येक सामान्य माणसालाही हे परिवर्तन अनुभवता यावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
केस गळती ही आता लाज वाटण्यासारखी गोष्ट राहिली नाही. हेअर ट्रान्सप्लांटला आपण नॉर्मल मानायला हवं. जसं दातांसाठी ब्रेसेस लावतो, त्वचेसाठी ट्रीटमेंट घेतो, तसंच केसांसाठीही योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – हेअर ट्रान्सप्लांट ही केवळ विज्ञान नाही, ही एक कला आहे. प्रत्येक केसाच्या नैसर्गिक वाढीचा विचार करून, चेहऱ्याच्या रचनेला सुसंगत असा लूक मिळावा यासाठी अत्यंत सूक्ष्म तपशीलांचा विचार केला जातो. म्हणूनच, आम्ही केवळ उपचार करत नाही, आम्ही तुमचं सर्वोत्तम रूप साकारतो!
आज, La Densitaeच्या नवीन अमनोरा क्लिनिकच्या माध्यमातून, आम्ही आणखी एका टप्प्यावर पोहोचलो आहोत. आमचा हा प्रवास अजून पुढे जाईल, आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीने, लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याची ही जबाबदारी आपण सर्वांनी एकत्र पार पाडूया.
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . तसेच या योजनेचा पुणेकरांनी ,विशेषता महिलांना लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .