माझ्या मरणाची वाट पाहत आहे का इच्छा मारण्याची परवानगी द्या….

माझ्या मरणाची वाट पाहत आहे का इच्छा मारण्याची परवानगी द्या

प्राध्यापकाचे उपोषण सुरू

विभागीय शिक्षण संचालकाच्या कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरू

पुणे :
पूर्णवेळ पगार देता येत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी प्राध्यापकाच्या कुटुंबियांनी केली. पुण्यातील विभागीय संचालक कार्यालयात बाहेर उपोषण सुरू केला आहे.विभागीय सहसंचालक, कार्यालयासमोर प्राध्यापकाचा आंदोलन सुरू आहे. अधिव्याख्याता पदाची पूर्णवेळ वेतन निश्चिती करण्याची प्रमुख जबाबदारी आपल्या कार्यालयाची आहे. तुमच्या अगोदरच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकावर पांघरून घालून सत्य आणि वास्तव नाकारणे उचित नाही. त्यांनी केलेल्या चुकांचा दोष तुमच्यावर घेऊ नका. शासन निर्णयानुसार पूर्णवेळ कार्यभार, नियुक्तीपासून महाविद्यालयात केलेले पूर्णवेळ कामकाज, विद्यापीठाची पूर्णवेळ मान्यतापत्र, अनुदान निर्धारण अहवालात मिळालेली पूर्णवेळ मान्यता, आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेला सकारात्मक आदेश या सर्व बाबींचा विचार करता पूर्णवेळ वेतन निश्चिती करण्याऐवजी आपण नकारात्मक पत्र देऊन टाळाटाळ केली आहे. तरी पूर्णवेळ वेतननिश्चितीच्या मागणीसाठी मा.संचालक, उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय, कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरू केलं आहे. अन्यथा मला इच्छा मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका ठोंबे यांची आहे.

Exit mobile version