महाराष्ट्रात भेट दिलेल्या शाळांचा आकडा 872 आहे.
मुंबई
राज्यातील 50 टक्क्यांच्या वरती असणाऱ्या शाळांमध्ये शाळांमध्ये मुलींसाठी वेगळे शौचालय असल्याचा अहवाला स्पष्ट झाला आहे.तर सरकारी शाळा नको म्हणत विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचं अहवाला स्पष्ट झाला आहे हा अहवाल काल प्रकाशित करण्यात आला.राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचा टक्का दिवसेंदिवस घसरत आहे.शैक्षणिक वर्षात 96.7 टक्के शाळांनी शाळा पूर्व तयारी मेळावा-पहिले पाऊल हा कार्यक्रम पहिलीच्या मुलांसाठी राबविल्याचे सांगितले. 90 टक्क्यांहून अधिक शाळांनी शाळेतील सर्व वर्गांना पाठ्यपुस्तके वितरित केल्याची नोंद केली आहे. सर्वेक्षणाच्या दिवशी 95.1 टक्के शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले गेल्याचे दिसून आले, 66.5 टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होती, 58.3 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी वेगळे आणि वापरण्यायोग्य शौचालयाची सुविधा होती.2022 च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल साडेसहा टक्क्यांनी विद्यार्थिसंख्या घटली आहे.2018 ला 61.6 टक्के, 2022 ला 67.4 टक्के आणि 2024 ला 60.9 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.2019 नंतरचा कोरोना काळ विचारात घेतला तरी 2018 च्या तुलनेत देखील विद्यार्थी घटल्याचेच स्पष्ट झाले आहे.त्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याची पालकांची मानसिकताच नसल्याची धक्कादायक माहिती असर संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाली आहे.देशाच्या आणि विविध राज्यांच्या शैक्षणिक स्थितीच्या सद्यःस्थितीवर प्रकाश टाकणारा असर अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला.राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 987 गावांमध्ये वय वर्ष 3 ते 16 मधील 33 हजार 746 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.सर्वेक्षणात पूर्व प्राथमिक (वयोगट 3-5), प्राथमिक (वयोगट 6-14) आणि मोठी मुले (वयोगट 15-16) या गटांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.तेथे 8 हजार 504 प्राथमिक शाळा आणि उच्च प्राथमिक किंवा उच्च वर्ग असलेल्या 7 हजार 224 शाळा होत्या महाराष्ट्रात भेट दिलेल्या शाळांचा आकडा 872 आहे.राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक शाळांना मागील आणि चालू या दोन्ही शैक्षणिक वर्षात पहिली ते तिसरीपर्यंत उपक्रम राबवण्याच्या सूचना सरकारकडून प्राप्त झाल्या होत्या.या शैक्षणिक वर्षात 96.7 टक्के शाळांनी शाळा पूर्व तयारी मेळावा-पहिले पाऊल हा कार्यक्रम पहिलीच्या मुलांसाठी राबविल्याचे सांगितले.90 टक्क्यांहून अधिक शाळांनी शाळेतील सर्व वर्गांना पाठ्यपुस्तके वितरित केल्याची नोंद केली आहे. सर्वेक्षणाच्या दिवशी 95.1 टक्के शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले गेल्याचे दिसून आले, 66.5 टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होती, 58.3 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी वेगळे आणि वापरण्यायोग्य शौचालयाची सुविधा होती.