• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

आयुष्यमान कार्ड  काढण्याची प्रक्रिया २५ दिवसात पूर्ण करावी! जिल्हाधिकारी

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in आरोग्य
0

आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

पुणे: जिल्ह्यात आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.

‘आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना राज्यात एकत्रित स्वरूपात राबविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबासाठी प्रत्येक सदस्याला आयुष्मान कार्डचे मोफत वितरण करण्यात येत आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ई-कार्ड बनविण्यासाठी अँड्रॉईड वर्जन आयुष्मान ॲप हे मोबाइल उपयोजक (अप्लिकेशन) तयार केले आहे. या मोबाइल ॲपद्वारे बेनिफिशरी लॉगिनमधून लाभार्थी व ऑपरेटर लॉगिनमधून सीएससी केंद्रचालक, ग्रामपंचायत ‘आपले सरकार सेवा केंद्र’चालक व आशा सेविका हे पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार ओटीपी किंवा चेहरा ओळखद्वारे (फेस ऑथेंटिकेशन) ई-कार्ड तयार करू शकतात.

पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी ५२ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले नाहीत. जिल्ह्यातील राहिलेल्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड लवकरात लवकर ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

त्यानुसार प्रत्येक गाव तसेच शहरातील वार्ड मध्ये रास्त भाव दुकानदार, आशा स्वयंसेविका, सीएससी केंद्र चालक यांनी एकत्रित येऊन नियोजन करावे. प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने त्यांच्याकडे नोंद असलेल्या सर्व कुटुंबांच्या सदस्यांची यादी तयार करावी. यादी केल्यानंतर त्यातील आयुष्मान कार्ड असलेले कुटुंब व नसलेले कुटुंब यांचे वर्गीकरण करावे. रास्त भाव दुकानदाराने आयुष्यमान कार्ड काढले नसलेल्या लाभार्थ्यांना रेशन दुकानात बोलवावे, याची जबाबदारी दुकानदारावर राहील.

गावातील सर्व आशा स्वयंसेविका व सीएससी केंद्रचालक यांनी रास्त भाव दुकानात दिवसभर उपस्थित राहून आलेल्या सर्व लाभार्थ्यांची मोबाइल अँप्लिकेशन द्वारे ई-केवायसी करावी. सदर ई-केवायसी कार्ड काढण्याची प्रक्रिया २५ दिवसात पूर्ण करावी.

ई-केवायसी करण्याच्या कामाचा आढावा तालुका स्तरावर घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात गटविकास अधिकारी सहअध्यक्ष, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिव आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी सहसचिव असतील असेही नमूद करण्यात आले आहे. अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्यात व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत उर्वरित आयुष्यमान कार्ड (ई-केवायसी) काढण्याची प्रक्रिया २५ दिवसात पूर्ण करावी, असेही निर्देश डूडी यांनी दिले आहेत.

Previous Post

व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार मराठी संगीत विश्वातील पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं

Next Post

श्रीमंत ‘दगडूशेठ’ गणपती ला सूर्यकिरणांचा महाभिषेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved