• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0

बांदिवडेकर फक्त सिनेमाच्या पडद्यावरच नव्हे, तर प्रत्यक्षातही एक परिपूर्ण सेट तयार करतात

मुंबई:प्रसिद्ध दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपट घरात गणपती द्वारे प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले, त्यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. HBO च्या लोकप्रिय सिरीज The White Lotus पासून प्रेरित, हा भव्य थीम-पार्टीचा सोहळा पाहुण्यांना थेट या मालिकेच्या समृद्ध, विलासी आणि ट्रॉपिकल जगात घेऊन गेला.

एका आलिशान हाय-राईज रूफटॉपवर रंगलेल्या या सोहळ्यात सिनेमॅटिक भव्यता आणि वास्तवातील ऐश्वर्य यांचा अनोखा मिलाफ दिसून आला. सजावट, खास थीमवर आधारित कॉकटेल्स आणि मालिकेतील पात्रांप्रमाणे ड्रेस कोड, यामुळे संपूर्ण वातावरण The White Lotus च्या जगात हरवून जाण्यासारखं वाटत होतं. पाहुण्यांनीही मालिकेतील पात्रांप्रमाणे भव्य रिसॉर्ट लुक आणि उत्साही व्यक्तिमत्त्व साकारून थीममध्ये रंग भरले.

या खास सोहळ्यासाठी महेश मांजरेकर, अनुषा दांडेकर, सुनील बर्वे, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर आणि इंडस्ट्रीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. वातावरण आलिशान असतानाही तितकंच उत्स्फूर्त होतं—गप्पा, हशा आणि खास थीम असलेले पेय यांची रेलचेल होती.

नवज्योत बांदिवडेकर, ज्यांनी आपल्या पुरस्कार विजेत्या पहिल्याच चित्रपटाने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्यांना बारकाव्यांकडे विशेष लक्ष देण्याची सवय आहे—आणि याची झलक त्यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यातही दिसून आली. घरात गणपती या चित्रपटाने त्यांना IFFI 2024 Award for Best Debut Director मिळवून दिला, आणि गेल्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी हा एक ठरला.

मात्र, The White Lotus मालिकेतील नाट्यमय ट्विस्ट्सच्या तुलनेत या रात्रीत कोणताही ड्रामा नव्हता—फक्त उत्तम सोबत, छान संगीत आणि एखाद्या सिनेमातील स्वप्नवत क्षणांसारखं वातावरण होतं. फिल्ममेकिंगसारख्याच त्यांच्या उत्कृष्ट सृजनशीलतेचा प्रत्यय या पार्टीतही आला—कारण नवज्योत बांदिवडेकर फक्त सिनेमाच्या पडद्यावरच नव्हे, तर प्रत्यक्षातही एक परिपूर्ण सेट तयार करतात!

Previous Post

शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतरच्या काळातील मराठी सरदारांचे तळपते कर्त्तृत्व संशोधन, लेखनासाठी प्रवृत्त करणारे ठरले

Next Post

महाबँक कर्मचार्‍यांचे ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved