• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Tuesday, March 3, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

पुण्याच्या गिर्यारोहकांनी केला भैरवगड सर

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in क्रीडा
0


एडव्हेंचर जंक्शन ने सर केली भैरावगडाची फ्रंट वॉल/
भैरवगड पश्चिम बाजूने सर

धनकवडी-
सह्याद्रीच्या खोर्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीचा भैरवगड (फ्रंट वॉल) पुण्यातील एडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर करून भगव्या धव्जासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
माळशेज घाट उतरल्यावर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावच्या दक्षिणेस भैरावगडाची अजस्त्र भिंत दिसते. भूगार्भाच्या परिभाषेत अशा भिंतीना डाईक असे संबोधतात. पूर्व पश्चिम दिशेत पसरलेल्या या भिंतीची उंची सुमारे ४५० फुट आहे. हि अजस्त्र भिंतच भैरवगड म्हणून ओळखला जातो. या किल्याच्या पश्चिम बाजूच्या कातळ भिंतीवर क्लाईम्बिंग रूट आहे. हा चढाई मार्ग सर करण्यासाठी सर्व आवश्यक उपकरणासह टीम शनिवारी मोरोशी गावात दाखल झाली रात्रीच ट्रेक करून किल्या जवळ टेंट लाऊन मुक्काम केला. पाहटे मानसिंह चव्हाण यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर कृष्णा मरगळे आणि लोकेश नाईलकर यांनी लीड क्लाईम्ब करत चढाई सुरु केली.
या दोघांनी सुरुवातीचे पहिले दोन स्टेशन म्हणजे तब्बल ३०० फुट ९० अंशातील प्रस्तारारोहन अवघ्या एका तासात पूर्ण केले. त्यांनतर मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे यांनी चढाई सुरु केली. तिसर्या स्टेशन नंतर ट्रॅव्हर्स मारल्यावर सरळउभी क्रॅक (भेग) पार करावी लागते. क्रॅक जवळ बोल्ट लांब असल्याने लोकेश नाईलकरने फ्रेंड्स चोक नट्स यासारख्या अत्याधुनिक उपकरणांचा योग्य वापर करून हा टप्पा पूर्ण केला. पाचव्या स्टेशन नंतर 60-70 निसरड्या दगड मातीचा ८० अंशातील मुक्त चढाईचा जोखमीचा टप्पा अनुभवी कृष्णाने
पार केला आणि टीमने सायंकाळी सहा वाजता शिखर गाठले. शंकर मरगळे यांनी मोहिमेस संपूर्ण टेक्निकल सपोर्ट दिला.
चढाईमार्गात मार्गात ओव्हरहँग, ओपन बुक, स्क्री (निसरडी दगडमाती) क्रक्स (अवघड भाग), फ्री क्लाईम्ब (मुक्त चढाई) अशी विविधता आहे. अत्याधुनिक उपकरणांचा योग्य वापर रूट पाहण्यासाठी ड्रोनचा मदत यामुळे मोहीम यशस्वीपणे पार पडली. गडमाथ्यावरून पश्चिमेला नानेघाटाचे टोक व पूर्वेला हरिश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो.

२०१२ साली झाले होते रीबोल्टिंग- पूर्वी पारंपारिक रिंग बोल्ट वापरून क्लाईम्बिंग केले जात होते. मात्र ते रिंग बोल्ट कालांतराने जंगून जुने झाल्याने चढाई मार्ग धोकादायक झाला होता. २०१२ साली सेफ क्लाईम्बिंग इनिशिएटीव (स्की) या संस्थेने त्याच चढाई मार्गावर काठीण्य पातळी जपून नवीन गंजरोधक बोल्ट लावले आहेत. त्यामुळे चढाई मार्ग सुरक्षित झाला आहे.

Previous Post

सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Next Post

पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved