Bj अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुखाचा डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे sasun
बीजे’ रॅगिंग प्रकरणी कारवाईBJ medical
विद्यार्थ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे भोवले ragging
पुणे: ‘बीजे’ मध्ये अस्थिव्यंगोपचार विभागात प्रथम वर्षाला शिकणाऱ्या निवासी विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंग झाल्याची तक्रार प्रथम या विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांच्याकडे केली होती. परंतु त्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवले असून डॉ. बारटक्के यांचा विभाग प्रमुखाचा पदभार काढण्यात आला आहे. तसेच रॅगिंग करणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांना सहा महिन्यासाठी शिक्षण सत्रातून व वसतिगृहातून निलंबित केले आहे.
या विभागाचा पदभार अपघात चिकित्सा विभागाचे प्रमुख (ट्रॉमा) डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान ते देखील रजेवर असल्याने या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल पुराणिक यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.याबाबत तक्रार आली असून डॉ. बारटक्के यांचा अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुखाचा पदभार काढला आहे. तर संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी अजून करण्यात येत असून लवकरच सविस्तर अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागला सादर केला जाईल.अशी माहिती डॉ. एकनाथ पवार यांनी दिली