लाडक्या बहिणीची फसवणूक केल्याचा आरोप करत काँग्रेस आक्रमक

जालन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दाखवले काळे झेंडे

जालना : विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रूपये हप्ता देण्याची घोषणा करूनही सरकारने अद्याप हा हप्ता दिला नाही. लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप करत शहरातील मंठा चौफुली भागात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे जालना शहराच्या दौऱ्यावर आले होते. दत्त मंदिराकडून जात असताना मंठा चौफुली भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला आहे. निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता देण्याची घोषणा करूनही अद्याप लागू केली नाही. लाडक्या बहिणींची सरकारने फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शहरातील नागरी समस्यांचा तात्काळ निपटारा करावा तसेच मोती तलावात तथागत भगवान गौतम बुध्दांचा प्रलंबित पुतळा बसवण्यात यावा. या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केल्याचे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं.

Exit mobile version