बीएसएनएलने स्कायप्रो आणि प्लेबॅाक्सटीव्ही सोबत हातमिळवणी करत भारतात सुरु केली ‘आयएफटीव्ही’ सुविधा
एका सबस्क्रिप्शनमध्ये ५५०+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि २०हून अधिक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्मचा घेता येणार लाभ
मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने स्कायप्रोसह हातमिळवणी करत भारतात पहिली फायबर-बेस्ड इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू केली आहे. या नवीन सेवेमुळे बीएसएनएल ग्राहकांना टिव्ही आणि इंटरनेटचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. यामध्ये ग्राहक उच्च स्ट्रीमिंग गुणवत्तेत ५५० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि प्रीमियम ओटीटी अॅप्स पाहू शकतील.
हा उपक्रम लाइव्ह टेलिव्हिजन आणि ऑन-डिमांड ओटीटी कंटेंट एकाच सबस्क्रिप्शन अंतर्गत जोडणार आहे, ज्यामुळे देशभरातील लाखो प्रेक्षकांना परवडणाऱ्या दरात उत्तमोत्तम सेवा व मनोरंजनाचा लाभ घेता येणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी दूरसंचार मंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, बीएसएनएल बोर्डाचे सीएमडी श्री. ए. रॉबर्ट जे. रवी, दूरसंचार विभागाचे आयएएस, सचिव डॉ. नीरज मित्तल, महाराष्ट्र बीएसएनएलचे सीजीएम श्री. हरिंदर मक्कर, स्कायप्रोचे संचालक आणि सीटीओ डॉ. पवनप्रीत एस. धालीवाल, स्कायप्रोचे व्यवसाय प्रमुख श्री नितीन सूद, प्लेबॉक्सटीव्हीचे संस्थापक आणि सीईओ श्री आमिर मुलानी आणि प्लेबॉक्सटीव्हीचे संचालक श्री सॅमसन जेसुदास उपस्थित होते.*
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे, जी आपल्या नवीन सेवेनं लोकांना मनोरंजनात्मक सेवा पुरवित आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या सेवेत आता कोणत्याही सेट-टॉप बॉक्सशिवाय ५५० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल मोफत पाहता येतील. आयएफटीव्ही सेवा उत्तम कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजनाचा लाभ घेण्यास मदत करते. ही भारतातील पहिली फायबर-आधारित इंटरनेट टीव्ही सेवा आहे, जी यूझर्सना कोणत्याही व्यत्ययाशिवाय ५५० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि प्रीमियम पे-टीव्ही कंटेंट क्रिस्टल क्लिअर गुणवत्तेत पाहण्याची परवानगी देते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बीएसएनएल भारत फायबर यूझर्स कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय या आयएफटीव्ही सेवेचा लाभ घेऊ शकतात.
ही सेवा ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रदान केली जाईल आणि यासाठी सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता नाही. ही सर्व्हिस थेट स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध होईल. भारतातील विविध शहरी तसेच ग्रामीण भागात, ४० लाखांहून अधिक एफटीटीएच ग्राहकांसह, बीएसएनएल आता त्यांच्या सर्व ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रीमियम टीव्ही आणि ओटीटी अॅप्स वापरण्याची सुविधा देते. FTTH (Fiber-to-the-home) ग्राहकांना या सेवेसाठी वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत.
या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना, महाराष्ट्र बीएसएनएलचे सीजीएम श्री. हरिंदर मक्कर सांगतात की, बीएसएनएलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि परवडणारे दरात सुविधा प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत. स्कायप्रो आणि प्लेबॉक्सटीव्ही सोबत आयएफटीव्ही लाँच करत आमच्या ग्राहकांसाठी, विशेषतः ग्रामीण भारतातील ग्राहकांसाठी मनोरंजन क्षेत्रातील एक मोठी क्रांती घडवून आणणार आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर लाईव्ह टीव्ही आणि प्रीमियम ओटीटी कंटेंट देऊन, आम्ही मनोरंजनाचा पुरेपुर लाभ घेण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत. ही हातमिळवणी आमच्या ग्राहकांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
स्कायप्रोचे संचालक आणि आयएफटीव्हीचे पार्टनर डॉ. पवनप्रीत धालीवाल सांगतात की, ग्राहकांना मनोरंजनाचा पुरेपुर आनंद घेता यावा हे स्कायप्रोचे ध्येय्य आहे. आयएफटीव्ही हे अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रदान करते ज्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो ग्राहकांना मनोरंजनाचा पुरेपुर लाभ घेता येणार आहे.
या सहकार्याबद्दल बोलताना प्लेबॉक्सटीव्हीचे संस्थापक आमिर मुलानी सांगतात की, बीएसएनएल आणि स्कायप्रो सोबतची ही हातमिळवणी भारतातील प्रत्येक घरात प्रीमियम डिजिटल मनोरंजन उपलब्ध करून देणार आहे. लाईव्ह टीव्ही आणि ओटीटी कंटेंट एकाच प्लॅटफॉर्मखाली पाहण्याचा लाभ याठिकाणी घेता येणार आहे.