तीनशे लोकांपासून आज या चळवळीला सुरुवात झाली आहे भविष्यात कसबा मतदारसंघातील तीन लाख लोक या चळवळीत सहभागी
इंदोर:गेल्या अनेक वर्ष राजकारणात काम करत असताना आज पहिल्यांदा स्वच्छता या सामाजिक विषयावर आयोजित अभ्यास वर्गात सहभागी झाले आमदार हेमंत रासने यांनी आपला कसबा ” स्वच्छ… सुंदर… आणि विकसित कसबा ” करण्यासाठी निवडून आल्यापासून या विषयावर जोरदार काम चालू केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून क्लीन सिटी इंदोर या शहराचा अभ्यास दौरा आयोजित केला होता .या अभ्यास दौऱ्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी , समाजात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार बांधव , विविध शाळांचे शिक्षक , जनतेच्या सतत संपर्कात असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असे तब्बल अडीचशे ते तीनशे लोकांचा समूह या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झाला होता .या अभ्यास दौऱ्यामध्ये पहिल्या दिवशी कचरा विलगीकरण करण्याचा प्रकल्प पाहिला यामध्ये सुक्या कचऱ्यातील विविध घटक आणि ओल्या कचऱ्यातील विविध घटक योग्य पद्धतीने विलगीकरण केले जातात. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जाते आणि हा गॅस बाजारात विकल्या सुद्धा जातो . या विलगीकरणातून मोठ्या प्रमाणावर जैविक खत निर्माण होते जे शेती कामासाठी अत्यंत उपयोगी असते आणि हे खत तेथे शेती साठी विकल्या सुद्धा जाते .
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ग्राउंड लेव्हल ला कचरा कसा गोळा केला जातो , नागरिकांकडून स्वतःहून कचरा विलगीकरण करून दिला जातो , रस्त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा कर्मचाऱ्यांकडून रस्ता साफ केला जातो , रस्त्याच्या दुतर्फा भिंत असेल किंवा पत्रे असतील तर ते योग्य पद्धतीने रंगवलेले आहेत जेणेकरून शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि परिसर सुद्धा स्वच्छ दिसेल . महानगरपालिकेकडून या ठिकाणी फक्त कचरा या विषयावर त्यांची स्वतःची एक कंट्रोल रूम आहे ज्यामध्ये कचरा गाडी वेळेत आपल्या परिसरात पोहोचते आहे की नाही यावर जीपीएस प्रणाली द्वारे लक्ष दिले जाते .
संपूर्ण दौऱ्यात एक गोष्ट जाणवली ती म्हणजे या शहरातील लोक या शहराला आपले मानतात , आपल्या परिवारा प्रमाणे मानतात आणि आपलं घर आपलं परिवार आपण जसा स्वच्छ ठेवतो त्या भावनेतून हे आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात.त्यामुळे आपल्याला आपला कसबा स्वच्छ ठेवायचा असेल तर हा कसबा आपला आहे आपला परिवार आहे हे याची जान ठेवून कसबा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी आमदार हेमंत रासने यांनी चालू केलेल्या ” स्वच्छ …सुंदर …आणि विकसित कसबा ” या मिशनमध्ये सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे .
या अभ्यास दौऱ्यामध्ये तेथील महानगरपालिकेच्या कचरा संदर्भातील विविध उपाय योजना या डोळ्यासमोर ठेवून आपल्या महानगरपालिके मध्ये कचरा संदर्भातील विषयावर अजून काय उपाययोजना करता येतील याचा सुद्धा एक आराखडा लवकरच तयार केला जाईल आणि त्यानुसार महापालिकेकडून सुद्धा प्रयत्न केले जातील असे आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या अभ्यास दौऱ्यात मिळाले .
आमदार हेमंत रासने यांनी सुरू केलेल्या स्वच्छ , सुंदर आणि विकसित कसबा ही एक चळवळ असून या चळवळीमध्ये समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी झाले पाहिजे . आपल्या मतदारसंघासाठी डोळ्यासमोर एक व्हिजन ठेवून ते व्हिजन पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून एक चळवळ निर्माण करणारा पहिला आमदार हेमंत रासने यांच्या रूपाने आज पाहिला . तीनशे लोकांपासून आज या चळवळीला सुरुवात झाली आहे भविष्यात कसबा मतदारसंघातील तीन लाख लोक या चळवळीत सहभागी होऊन आमदार हेमंत रासने यांच्या प्रयत्नातून ” स्वच्छ…. सुंदर… आणि विकसित कसबा ” नक्की करतील .