काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचे पंख छाटले

नागपूर : युवक काँग्रेसच्या तब्बल ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याचा आदेश ताजा असतानाच आता युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना हा धक्का मानला जात आहे. त्यांच्याच सांगण्यावरून पाच डझन पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

युवक काँग्रेसच्यावतीने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात महाल येथील संघमुख्यलयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाला दांडी मारणाऱ्या ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडी पदमुक्त करण्याचे आदेश युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांनी काढले होते. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सांगण्यवरून घेण्यात आल्याचा पदमुक्त पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.

त्यांना निष्क्रिय ठरवण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप राऊत यांच्यावर केला जात आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी काही नियमावरीली पक्षाने तयार केली आहे. कारवाई व पदमुक्त करायचे असले तर संबंधिताला नोटीस बजावून त्याचे म्हणणे ऐकूण घ्यावे लागते.  मात्र कुणाल राऊत यांनी सर्व नियमावली डावलून हुकूमशाही पद्धतीने युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले.

Exit mobile version