छावा चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार – ॲड. वाजीद खान (बिडकर)

‘छावा’ चित्रपटातील ‘त्या’ प्रसंगाला कात्री ॲड. वाजीद खान (बिडकर) यांच्या लढ्याला यश

छावा चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार – ॲड. वाजीद खान (बिडकर)

छावा हा चित्रपट इतिहास अभ्यासक आणि तज्ञ मंडळी यांना दाखवूनच प्रदर्शित करा – ॲड. वाजीद खान (बिडकर)

पुणे :अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आणि या स्वराज्याची धगधगती मशाल पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी अखंडपणे तेवत ठेवली. छत्रपती संभाजीराजे यांच्या अद्वितीय शौर्याचा इतिहास मांडणारा ‘छावा’ या  हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शंभूराजे हे
लेझिम खेळताना दाखवल्याने ॲड. ॲड. वाजीद खान (बिडकर) यांनी आक्षेप घेवून हा सीन तात्काळ चित्रपटातून काढून टाकावा. असे त्यांनी सोशल मिडीयाच्या व ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना संपर्क करून सांगितले होते.

त्यानंतर समाज माध्यमातून व राजकीय लोकांनी हस्तक्षेप केल्यामुळे जनसामान्यातून मोठी चळवळ उभी राहिली. त्यानंतर दिग्दर्शक उत्तेकर यांनी छावा चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार असल्याचे  स्पष्ट केले आहे. उत्तेकर यांनी अखेर एक पाऊल माघे घेऊन चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य हटवले जातील असे सांगितले. “ह्या दृश्यामागे कोणाच्या ही भावनांना ठेच पोचवण्याचा हेतु नव्हता, छत्रपती संभाजी महाराज काय होते, किती महान राजा होते, त्यांचा संघर्ष काय होता, हे संपूर्ण जगाला कळायला हवे. एक – दोन दृश्यांमुळे संपूर्ण चित्रपटाला गालबोट लागणार असेल तर आम्ही ते दृश्य नक्कीच हटवून टाकू” असे उतेकरांनी सांगितले.

चित्रपटात लेझिम खेळताना दाखवले लेझीम नृत्याचा प्रसंग हा महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे हा सीन उतेकर काढणार आहेत. तसेच छावा हा चित्रपट इतिहास अभ्यासक आणि तज्ञ मंडळी यांना दाखवूनच प्रदर्शित करण्यात यावा. तसे नाही केल्यास चित्रपटावर बंदी आणू वेळ पडल्यास कोर्टाचे दरवाजे ठोठवले जातील. असे ॲड. वाजीद खान (बिडकर) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Exit mobile version