विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नवी दिल्लीतील कालकाजी मंदिरात दर्शन, समाजासाठी केली विशेष प्रार्थना
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नवी दिल्लीतील श्री कालकाजी मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी कुटुंबासाठी प्रार्थना केली तसेच आपल्या आयुष्यात लाभलेल्या चांगल्या भाग्याबद्दल देवीचे आभार मानले.
यावेळी त्यांनी संपूर्ण समाजासाठीही मंगलकामना केली. समाजात शांतता नांदो, सर्व प्रकारची हिंसा आणि वाईट प्रथा नष्ट व्हाव्यात तसेच प्रत्येकाला ज्ञान, आरोग्य आणि उत्तम नशीब मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली.