८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजन
पुणे :विचारवेध असोसिएशन च्या वतीने ‘जातिअंतासाठी करू काही’ या विषयावर दि.८ व ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात राष्ट्र सेवा दल (पर्वती पायथा) येथे विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ उमा चक्रवर्ती यांच्या हस्ते ,आनंद करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडे दहा वाजता संमेलनाचे उदघाटन होणार आहे.संमेलनात जात- निहाय गणना गणना,आरक्षण ,प्रसिद्धी माध्यमे ,जातीचे अर्थशास्त्र अशा विविध विषयावर विचारसत्रे आयोजित करण्यात आली आहेत.नीरज हातेकर,सुरेंद्र जोंधळे,उमेश बगाडे,रघुनाथ(दादा) पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार विचार मांडणार आहेत.हे संमेलन निःशुल्क असून जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे. संमेलनाचे हे ६ वे वर्ष आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत या संमेलनाची माहिती देण्यात आली.यावेळी आनंद करंदीकर,सरिता आवाड, संदीप बर्वे,अनिकेत साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
८ फेब्रुवारी रोजी संमेलनाचे उदघाटन झाल्यावर पावणे बारा वाजता सचिन गरुड,उमेश बगाडे हे ‘जातीचे अर्थशास्त्र’ विषयावर बोलणार आहेत .दुपारी २ वाजता ‘जाती अंतासाठी माध्यमे :काल ,आज ,उद्या ‘ या विषयावर चर्चा होणार असून त्यात रोशन मोरे,शर्मिष्ठा भोसले,अभिजित कांबळे,रवींद्र आंबेकर सहभागी होणार आहेत.दुपारी ४ वाजता लक्ष्मी यादव आणि दीपक आबनावे यांच्याहस्ते आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.त्यामध्ये विशाल- आरजु,अतिश – अमृता,भीम- लीना यांचा समावेश आहे.त्यानंतर पुस्तक प्रकाशन आणि ‘चौराहा’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सचिन माळी ,दिलीप चव्हाण हे ‘जातीय जनगणना’ विषयावर बोलणार आहेत.नीरज हातेकर हे ‘आरक्षण संकल्पना आणि उद्देश ‘ तर ‘आरक्षण आणि आरक्षणाचे भवितव्य’ या विषयावर राहुल सोनपिंगळे बोलणार आहेत. ‘जातीय उतरंडीमुळे जातीय अत्याचार’ या विषयावर वैभव गीते संवाद साधणार आहेत.’जाती जपण्यासाठी स्त्रियांवर अत्याचार-सांस्कृतिक संदर्भ ‘ विषयावर आनंद करंदीकर संवाद साधणार आहेत. ;जातीय अत्याचार पुरुष प्रधानतेमुळे’ या विषयावर अंजुम कादरी विचार मांडणार आहेत.शीतल साठे,सचिन माळी हे ‘नवयान महाजलसा’ सादर करणार आहेत.