महिला दिननिम्मित्त वयाची शंभरी पार केल्याबद्दल इक्राम खान यांनी हारू बाई बनसोडे यांचा केला सन्मान
पुणे :जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रामवाडी झोपडपट्टीतील महिलांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक आघाडी शरद पवार गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व गोल्फ क्लब येरवडाचे कप्तान इक्रम खान यांच्या हस्ते संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले .
तसेच यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून रामवाडी वसाहतीतील वयाची शंभर वर्षे पूर्ण केल्याबद्दल हारु बाई बनसोडे यांच्या सन्मान ही इक्रम खान यांनी केला .या कार्यक्रमास इक्रम खान ,माजी नगरसेवक राजू शिरसाट,सामाजिक कार्यकर्ते एलिझाबेथ वर्गीस प्रमुख मान्यवर उपस्थित होते .यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.