डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी केली डॉक्टर प्रियकराला अटक
पुणे विवाहाचे आमिषाने डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात पोलिसांना यश आला आहे.विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा फायदा घेतला होता.पुण्यातील बिबवेवाडी परिसरात महिला डॉक्टर ने तिच्याच क्लिनिक मध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती.सांगलीतील डॉक्टरला बिबवेवाडी पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक केली.डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत याला अटक करत बिबेवाडी पोलिसांनी कोर्टात हजर केलं.डाॅक्टर तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती
मिळालेल्या माहितीनुसार, एका विवाहविषयक संकेतस्तळावर डॉ पल्लवी फडतरे आणि सावंत यांची ओळख झाली. विवाहित असताना सुद्धा सावंत याने तरुणीपासून ही बाब लपविली होती. त्यानंतर त्याने डाॅक्टर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, सावंत विवाहित असल्याचे कळल्यावर डॉ पल्लवी यांना मानसिक धक्का बसला आणि यातून त्यांनी आत्महत्या केली आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी डाॅक्टर सावंतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.