• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
The Dhakka
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Monday, March 2, 2026
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित संगीतोत्सव : दिग्गज कलाकारांचा सहभाग

The Dhakka by The Dhakka
January 26, 2026
in मनोरंजन
0

राग प्रहरांच्या संकल्पनांपासून मुक्त
‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे 2 मार्चला आयोजन

पुणे : राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे रविवार, दि. 2 मार्च 2025 रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत सादरीकरणाला राग-समयाचे बंधन नको या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित गायन-वादनाचा हा पहिला संगीत महोत्सव आहे.
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील रागांचे समय प्रहरानुसार सादरीकरण करायचे झाल्यास ज्या प्रहरात सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत ते राग विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. तसेच मिश्र रागांचे सादरीकरण होणे शक्य नाही. यातून पर्यायाने भारतीय संगीत क्षेत्राचे आणि कलाकाराचे नुकसानच होईल. अशा परिस्थितीत कोणत्याही रागाचे कोणत्याही वेळी उत्तम प्रस्तुतीकरण होऊन तो रोग त्याच्या पूर्ण सौंदर्यासह खुलविला जाऊ शकतो, अशी धारणा डॉ. प्रभा अत्रे यांची आहे. या संकल्पनेला अनुरसरून हा महोत्सव आयोजित केला असल्याचे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
संगीतोत्सव दि. 2 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 9:30 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या सत्राची सुरुवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे. त्यानंतर पंडित उदय भवाळकर, पंडिता पद्मा तळवलकर, पंडित राम देशपांडे, पंडित राजा काळे यांचे गायन होणार आहे.
दुसऱ्या सत्राची सुरुवात दुपारी 4 वाजता होणार असून सुरुवातीस ताकाहिरो अराई यांचे संतूर वादन होणार आहे. त्यानंतर पंडित श्रीनिवास जोशी, पंडित विनायक तोरवी, पंडिता अलका देव-मारुलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन होणार आहे.
कलाकारांना पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पंडित योगेश समसी, पंडित अरविंदकुमार आझाद, भरत कामत, ऋषिकेश जगताप, प्रशांत पांडव, अजिंक्य जोशी (तबला), चैतन्य कुंटे, सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी, अविनाश दिघे, राहुल गोळे (संवादिनी), मृणाल उपाध्याय, प्रताप आव्हाड (पखवाज) साथसंगत करणार आहेत.

राग प्रहरांच्या संकल्पनेविषयी डॉ. प्रभा अत्रे यांचे विचारधन होणार प्रकाशित

राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांविषयी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ‌‘विज्ञानाच्या दृष्टीकोनातून राग-रस, राग-समय‌’ या विस्तृत वैचारिक लेखाची पुस्तिका ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’त प्रकाशित केली जाणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे विचारधन संगीत अभ्यासक, कलाकार, संगीतप्रेमी यांच्यासाठी खुले होणार आहे. ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’त सहभागी दिग्गज कलाकारांचे या संकल्पनेविषयी असलेले विचारही यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

Previous Post

देश पुढे नेण्यासाठी विद्यार्थी दशेत मुलांना घडविले पाहिजे.उद्योजक होण्यासाठी साहित्यातून प्रेरणा मिळते

Next Post

संरक्षण खात्यातील ड्रोन ट्रेनरला मिळणार प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Business, Small Business (1)
  • Untitled (14)
  • आरोग्य (26)
  • कृषी (19)
  • क्राईम (22)
  • क्रीडा (24)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (40)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (93)
  • राजकारण (49)
  • राज्य (93)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved