चिमुकल्या नातवंडांच्या वाढदिवसानिमित्त आजोबांकडुन देलवडी येथे रघुवीर खेडेकर तमाशाचे आयोजन
४ वर्षापूर्वी नातवांच्या वाढदिवसानिमित्त मी निवृत्ती इंदुरीकर महाराजांची किर्तन
दौंड:वाढदिवसाला बैलगाडा शर्यती ,कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा असे उपक्रम आयोजित केल्याचे आपण पाहिले आहे. परंतु देलवडी तालुका दौंड येथील हौशी माऊली वाघोले या आजोबांनी आपल्या तन्मय वाघोले पाटील व चिन्मय वाघोले पाटील या चिमुकल्या नातवांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चक्क महाराष्ट्रातील सर्वात मोठा रघुवीर खेडेकर हा लोकनाट्य तमाशा मनोरंजन म्हणून ठेवला आहे. तमाशाचे आयोजन आज आयोजित केला आहे. विशेष म्हणजे आजोबांनी यासाठी १ लाख ४० हजार रुपये मोजले आहेत. रघुवीर खेडकर घडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठा व दर्जेदार लोकनाट्य तमाशा समजला जातो. या लोकनाट्य तमाशातील तब्बल १०० कलावंत आपल्या कलाकारितून चिमुकल्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देणार आहेत.त्यामुळे हा वाढदिवस तमाशा शौकींनांसाठी एक पर्वणीच ठरणार असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.लोकनाट्य तमाशा आतापर्यंत गावोगावच्या यात्रेच्या निमित्ताने होत असतो असा पायंडा आहे. परंतु पहिल्यांदाच वाढदिवसाच्या निमित्ताने हा तमाशा होत असल्याने परिसरात प्रचंड उत्सुकता आहे.
४ वर्षापूर्वी नातवांच्या वाढदिवसानिमित्त मी निवृत्ती इंदुरीकर महाराजांची किर्तन ठेवले होते. यापूर्वी वाढदिवसानिमित्त अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम केले आहेत.यावेळी वेगळा प्रयत्न केला आहे.तमाशा लोककला आहे. ती कला जोपासण्याचा प्रयत्न याद्वारे करण्याचा आमचा छोटेखानी प्रयत्न आहे.
रघुवीर खेडकर( लोकनाट्य तमाशाचे मालक)
पूर्वी तिकिटावरती तमाशा असायचा. त्यानंतर गावोगावच्या यात्रेनिमित्त तमाशा सुरू झाला. वाघोले हे नातवांच्या वाढदिवसानिमित्त तमाशा घ्यावा यासाठी माझ्याकडे अनेक दिवसांपासून आग्रही होते .आम्हा कलावंतासाठी हा पहिलाच अनुभव आहे. तमाशातील ३० नृत्यांगना आपल्या स्पेशल स्टाईलमध्ये वाघोले पाटील घरातील चिमुकल्यांसाठी व प्रेक्षकांसाठी कलेची मेजवानी देत शुभेच्छा देणार आहेत.