भव्य श्री गणेश याग, नेत्र तपासणी शिबिर व महाप्रसादाचे आयोजन
पुणे: पुण्यातील बुधवार पेठ येथे बाल विकास मंडळाच्या वतीने गणेश जन्म सोहळा 2025 मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.1 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री गणेश याग संपन्न झाला, ज्यामध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यात नामांकित नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी आणि सल्ला देण्यात आला.सोहळ्याचे उद्घाटन कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.हेमंत भाऊ रासने यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच, पर्वती विधानसभेच्या आमदार व राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ यांनीही या सोहळ्याला भेट दिली आणि आयोजकांचे कौतुक केले.
महाप्रसादात विशेष सामाजिक उपक्रम
2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता श्री गणेश महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे महाप्रसादाची सुरुवात स्पेशल चाईल्ड (विशेष गरज असलेल्या मुलांना) प्राधान्य देऊन करण्यात आली. आयोजकांनी या बालकांना सर्वप्रथम बोलावून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना पहिल्या पंक्तीत बसवून महाप्रसाद दिला. त्यानंतर इतर भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्याची संधी देण्यात आली.