घरत गणपती’ २०२४ मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक,

प्रमुख भारतीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये ३५ नामांकने मिळवत पुढे सरसावला

मुंबई:IFFI गोवा २०२४ मध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर, प्रसिद्ध दिग्दर्शक नवज्योत बंडिवडेकर यांचा घरात गणपती पुरस्कारांमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. भारतातील काही प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांमध्ये तब्बल ३५ नामांकने मिळवत, हा चित्रपट २०२४ मधील सर्वाधिक गौरव मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

या पुरस्कार यात्रेत आघाडीवर असलेल्या घरात गणपती ला झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ मध्ये १७ नामांकने, रेडिओ सिटी सिने अवॉर्ड्समध्ये ४ नामांकने, आणि NDTV मराठी अवॉर्ड्समध्ये १४ नामांकने मिळाली आहेत.

त्याच्या अभूतपूर्व यशात भर घालत, घरत गणपती २०२४ मधील सर्व प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर सर्वाधिक रेटिंग मिळवणारा मराठी चित्रपट ठरला आहे. IMDb, Google आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर विक्रमी रेटिंगसह, या चित्रपटाने वर्षातील इतर सर्व मराठी रिलीजला मागे टाकले आहे.

२६ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित झालेला आणि सध्या अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणारा हा चित्रपट, भूषण प्रधान आणि निकिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका आणि प्रभावी कथानक व संवेदनशील दिग्दर्शनामुळे पुरस्कार सोहळ्यांमध्ये ऐतिहासिक यश मिळवण्याच्या तयारीत आहे.

या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना नवज्योत बंडिवडेकर म्हणाले,
”‘घरत गणपती’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. प्रत्येक नामांकन हा आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आणि उत्कटतेचा सन्मान आहे. प्रेक्षकांशी या चित्रपटाने निर्माण केलेली भावनिक नाळ पाहून आनंद होतो. या टप्प्यावर पोहोचलो असलो तरी, सांस्कृतिक वारसा आणि मानवी भावना मांडणारी ही कथा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणखी मोठी मजल मारेल, याची मला खात्री आहे. आम्ही एक अमिट ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहोत, आणि पुढे काय घडतं हे पाहण्यास मी उत्सुक आहे.”

विविध श्रेणींमध्ये मिळालेल्या नामांकनांसह, घरत गणपती या वर्षीच्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जसजसे पुरस्कार सोहळे जवळ येत आहेत, तसतसे मराठी चित्रपटसृष्टीच्या कक्षा रुंदावणाऱ्या या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version