राज्याच्या विविध कोपऱ्यातून ४५० हून अधिक फार्मसी आणि फार्मा मॅनेजमेंट विद्यार्थी उपस्थित
कात्रज:भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे पूना कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन विद्यार्थी मंच पुणे (आयपीएएसएफ पुणे) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ६ व्या ‘आंतरराष्ट्रीय फार्मा ई-सिम्पोजियम २०२५’चे आयोजन केले.दि.१५,१६ फेब्रुवारी २०२५ रोजी सुश्रुत सभागृह(भारती विदयापीठ,धनकवडी) येथे झालेल्या या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.
या फार्मा ई-सिम्पोजियमचे उद्घाटन ब्रिंटन फार्मास्युटिकलचे अध्यक्ष राहुलकुमार दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, उप-प्राचार्य डॉ. एल. साथीयानारायणनन, आयपीए पुणेचे माजी अध्यक्ष डॉ. चंदकांत कोकरे, सचिव डॉ. रवींद्र कांबळे, आयपीए विद्यार्थी मंच पुणेचे अध्यक्ष देव डांगी व इतर मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमरजितसिंग राजपूत यांनी या परिषदेचे संयोजन केले.
या परिषदेत औषधनिर्माण शास्त्रामध्ये उद्योजकता विकास, स्टार्टअप्स, इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, मार्केटिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या विषयांवर विचार मंथन करण्यात आले. राज्याच्या विविध कोपऱ्यातून ४५० हून अधिक फार्मसी आणि फार्मा मॅनेजमेंट विद्यार्थी उपस्थित राहिले.
यावेळी बोलताना ब्रिंटन फार्मास्युटिकलचे राहुल कुमार दर्डा म्हणाले,’भारत हा फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी ४ लाख कोटींचे केंद्र आहे आणि पुढील ५ वर्षांत या क्षेत्राचा विस्तार १० लाख कोटींपर्यंत होईल, असा मला विश्वास आहे. नवीन पिढीत नेतृत्व व उद्योजकीय क्षमता वाढवण्याचे काम या सिम्पोजियम द्वारे होत आहे, जे मी माझ्या विद्यार्थीजीवनात यापूर्वी कधीच अनुभवले नाही.”
….