• मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Wednesday, August 6, 2025
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
No Result
View All Result
Wednesday, August 6, 2025
The Dhakka
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक
Home मनोरंजन

गायन-वादन-नृत्याच्या मिलाफाने रंगला ‌‘ज्ञानदेव संगीत महोत्सव‌’

The Dhakka by The Dhakka
May 4, 2025
in मनोरंजन
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


Danceical music अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमीतर्फे आयोजन gyandev

पुणे : युवा व्हायोलिनवादक राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन, प्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांचे बहारदार गायन तर जगविख्यात तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘मेलोडिक रिदम‌’ या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. गायन-वादन-नृत्य या तीनही कलांचा अनोखा मिलाफ यातून अनुभवायला मिळाला.
अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे यांच्या वतीने पुणे विद्यार्थी गृहाच्या कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात ‌‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा‌’चे आयोजन करण्यात आले होते. Pandit
कार्यक्रमाची सुरुवात अकादमीतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‌‘कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर‌’ या पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगाने झाली. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक विलास जावडेकर, दादा तरंगे, अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. Raghunath
युवा व्हायोलिन वादक राजस उपाध्ये यांनी राग झिंझोटीमधील आलाप, झपताल, तीनताल आणि मध्यलयतील बंदिश सादरीकरणाने केली. त्यानंतर उपाध्ये यांनी राग किरवाणी सादर केला. कधी सुरांची आराधना करत तर कधी सुरांशी लडिवाळपणे संवाद साधत उमटलेले व्हायोलीनचे सूर रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. अनुराग अलुरकर (तबला) यांनी दमदार साथ केली. पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे गुरू मधुसूदन नारायण कुलकर्णी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या युवा वादक पुरस्काराने राजस उपाध्ये यांना सन्मानित करण्यात आले.
किराणा व ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळालेले सुप्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग भूपालीतील विलंबित तीन तालातील ‌‘अब मानले‌’ या बंदिशीने केली. द्रुत लयीत ‌‘जाऊ तोरे चरण‌’ ही भातखंडेबुवांनी रचलेली बंदिश प्रभावीपणे सादर करत द्रुत एकतालात रामश्रय झा यांची ‌‘मान लिजीए सुंदरवा‌’ ही रचना सादर केली. हेगडे यांनी मैफलीची सांगता केदार रागातील गुरू पंडित विनायक तोरवी यांच्या ‌‘चलो चलो हटो सैंय्या मोरे‌’ या बंदिशीच्या सादरीकरणाने केली. हेगडे यांचा खुला आवाज, स्पष्टोच्चार, दमदार ताना आणि सुश्राव्य गायनाने रसिक प्रभावीत झाले. अमेय बिचू (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला) यांची सुरेल साथसंगत होती. Vijay ghate
पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘मेलोडिक रिदम‌’ या गायन-वादन आणि नृत्य कलांचा अनोखा संगम साधणाऱ्या अनोख्या कार्यक्रमाला रसिकांसह उपस्थित कलाकारांनी मनमुराद दाद देत आनंद घेतला. सुरुवातीस सुरंजन खंडाळकर यांनी वडिल, गुरू रघुनाथ खंडाळकर यांनी रचलेली ‌‘राधे देवो बांसुरी‌’ ही भक्तीरसपूर्ण रचना सादर केली. त्यावर कथक नृत्यांगना शितल कोलवालकर यांनी नृत्याविष्कार सादर केला. पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त एकल तबलावादनाने रसिकांना मोहित केले. तबला, पखवाज आणि नृत्य यांच्या जुगलबंदीला उपस्थित कलाकार व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता सुरंजन खंडाळकर यांनी ‌‘धन्य भाग सेवा का अवसर पाया‌’ या सुप्रसिद्ध भैरवीने करताना गायन-वादन आणि नृत्य यांचा अनोखा मिलाफ पहावयास मिळाला. अमेय बिचू (संवादिनी), ओंकार दळवी (पखावज), सागर पटोकार (पढंत) यांनी समर्पक साथ केली.कलाकारांचा सत्कार पंडित रघुनाथ खंडाळकर, संध्या खंडाळकर, विलास जावडेकर, दादा तरंगे, बाळासाहेब भोपे, मधुकर शिंदे, लहू लोहकरे यांनी केला. सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी केले.

ShareSendTweet
Previous Post

मद्यधुंद चालकासह चौघांना आठ मे पर्यंत पोलिस कोठडी

Next Post

कांबळे उर्फ “लॅपटॉप” अखेर अटकेत पुणे दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

Related Posts

मनोरंजन

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला

June 9, 2025
मनोरंजन

स्वतःवर विश्वास असणारेच खरे आस्तिक: सचिन पिळगावकर

June 4, 2025
मनोरंजन

गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

May 4, 2025
मनोरंजन

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

March 18, 2025
मनोरंजन

शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतरच्या काळातील मराठी सरदारांचे तळपते कर्त्तृत्व संशोधन, लेखनासाठी प्रवृत्त करणारे ठरले

March 11, 2025
मनोरंजन

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रदर्शित होणार

March 11, 2025
Load More

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

दीपक टिळक यांचे निधन.. अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली

July 16, 2025

पौड पोलिसांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप कारवाईची मागणी कारवाईची मागणी

July 16, 2025

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला

June 9, 2025

यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी

June 9, 2025

डॉ. राधाकिशन पवार यांची बदली कुष्ठरोग उपसंचालक पदावर– कार्यकाळ संपण्‍याआधीच बदली

June 9, 2025

Popular News

  • शिवदुर्ग दर्शन समितीची किल्ले रोहिडा मोहीम जल्लोषात

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Untitled (2)
  • आरोग्य (25)
  • कृषी (19)
  • क्राईम (20)
  • क्रीडा (23)
  • गुंतवणूक (12)
  • देश विदेश (39)
  • धार्मिक (47)
  • मनोरंजन (89)
  • राजकारण (43)
  • राज्य (92)
  • शिक्षण (41)
The Dhakka

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Navigate Site

  • मुख्यपृष्ठ
  • About Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • राज्य
  • देश विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • कृषी
  • गुंतवणूक
  • धार्मिक

© 2025 The Dhakka. All Rights Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Go to mobile version