दर गुरुवारी हडपसर येथे महिलांना केसगळती समस्येवर मिळणार मोफत सल्ला व मार्गदर्शन—
पुणे: केस गळती ही आज केवळ सौंदर्याचा नव्हे, तर आत्मविश्वासाचा मोठा मुद्दा बनली आहे. अलीकडच्या काळात तरुणांसाठी ही समस्या गंभीर बनत चालली असल्याचे मत सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांनी व्यक्त केले .ला डेन्सिटे या संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने १०,००० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानिमित्त दर गुरुवारी सर्वांसाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन योजना शुभारंभ व नववी शाखा उद्घाटन समारंभ पार पडला त्यावे ताम्हणकर बोलत होत्या .
पुण्यातील महिलांनी व तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सई ताम्हणकर यांनी यावेळी केले .
अभिनेता प्रसाद ओक यांनी केसांची निगा राखण्यासाठी आहार व पाणी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे निदर्शनास आणून दिले .क्रिकेटर अशोक धिंडा यांनी आपण केस गळतीचे कसे शिकार झालो यांबाबत अनुभव सांगितले .तसेच आपली ही केसांची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले व योग्य वेळी केसांची निगा राखण्याचे उपस्थितांना सांगितले .
या कार्यक्रमाचे आयोजक ,ला डेन्सिटे चे संस्थापक डॉ.गजानन जाधव यांनी संस्थेची माहिती सांगितली .तसेच आम्ही सुरू केलेल्या योजनेला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले . या उद्घाटन समारंभास सिनेअभिनेते प्रसाद ओक,अभिनेत्री सई परांजपे,क्रिकेटर अशोक धिंडा,डॉ.गजानन जाधव ,उपस्थित होते.