पुणे : दिवसेंदिवस जगभरात अनेक आजार वाढत आहेत. कॅन्सर सारखा आजार अत्यंत भयानक असून त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू व्हावेत यासाठी पुण्यातील इंटिग्रेटेड कॅन्सर सेंटर वाघोली यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सरवर आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहेत. इंटिग्रेटेड कॅन्सर सेंटर वाघोली यांच्या सेंटरमध्ये ब्राझील मधील 20 डॉक्टरांची एक टीम दाखल झाली आहे. ही टीम याचा अभ्यास करत असून लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरू केले जाणार आहेत.
ट्रॅडिशनल पद्धतीने किंवा आपले जे शास्त्र आहेत. ब्राझील मधील आयुर्वेद कसा ऍलोपॅथिक संस्थेचे डॉक्टर पुण्यात आले आहेत. कॅन्सर आयुर्वेदाने कसा बरा करता येऊ शकतो किंवा त्याच्यावर कशी चिकित्सा करता येऊ शकते त्याच्यासाठी ते इकडे आलेले आहेत.आपण ब्राझीलमध्ये तिकडच्या मेडिकल डॉक्टर साठी किंवा तिकडचे जे काही आधुनिक चिकित्सक आहेत त्यांच्यासाठी आपण कॅन्सरचा इंटिग्रेटिव्ह कोर्स सुरू करत आहोत.
कॅन्सरवर कोर्स जो आहे. तो वर्षभर चालणार आहे .आणि त्याच्यामध्ये तिकडचे जे डॉक्टर्स आहेत ते इकडन ऑनलाइन शिकतील आणि जो ऑफलाइन इंटरशिप आहे. त्याच्यासाठी ते पुण्याला हॉस्पिटल मध्ये येतील.आतापर्यंत संशोधन केला आहे. त्याच्यामध्ये आम्ही असं कधीच म्हणू शकत नाही की आयुर्वेदाने कॅन्सर बरा होतो. पण हो आयुर्वेदाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलिटी ऑफ लाइफ इम्प्रू होते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे केमोथेरपी दिली जाते जे रेडिएशन्स दिले जातात त्याच्या आपल्या शरीरावर बऱ्याच प्रमाणामध्ये काही साईड इफेक्ट्स दिसतात तर ते साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदिक चिकित्सनेमध्ये पंचकर्म असतील किंवा औषध असतील किंवा आहार विहार असेल या सगळ्या पद्धतीने आपल्याला ते त्याच्यावर ते चांगले रीतीने आपल्याला रिझल्ट मिळालेले दिसतील.अशी माहिती डॉक्टर सुकुमार सरदेशमुख यांनी दिली.
ब्राझील आणि भारतातील जीवनशैलीत खूप फरक आहे. हवामान बदल खाण्याच्या पद्धती यामुळे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण आढळतात मात्र हे प्रमाण भारतात नाही. त्यामुळे आम्ही आता आयुर्वेदाकडे वळालो असल्याची माहिती ब्राझीलचे डॉक्टर यांनी दिली.