पुणे : गर्भलिंग विरोधात राज्य सरकार आता कडक पावले उचलणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर आले आहेत. गर्भलिंग करणाऱ्या विरोधात राज्य सरकारकडून गंभीर पावले उचलली आहेत. गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना आता एक लाख रुपये बक्षीस राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत.
तर या प्रकरणात धाडसाने समोर येणाऱ्या पिढीत महिलेला देखील एक लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. पी सी पी एन डी टी हा ऍक्ट प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगत येत्या काही दिवसात याबाबतचा अध्यादेश जारी केले जाणार आहेत. अशी माहिती प्रकाश आंबिटकर यांनी दिली
गर्भलिंग निदान विरोधात राज्यातील सर्वच पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य व्यवस्थेला सूचना दिल्या आहेत. पुढच्या पंधरा दिवसात त्याबाबत कारवाही दिसेल. या कायद्याला अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे.
नुकतीच आरोग्य विभागाची एक बैठक झाली आहे. ज्या सामाजिक संस्था यांना या प्रक्रियेत सामावून घेणे, पोलीस आणि आरोग्य विभाग आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.राज्यात गर्भलिंग निदान अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या केले जात आहे. त्यामुळे सरकारला हे पाऊल उचलावे लागत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापुरात ते बोलत होते.