वाल्मीक कराडची टोळी संपवायची असेल तर पोलिसांच्या बदल्या करा तृप्ती देसाई

वाल्मीक कराडच्या मर्जीतील 26 पोलीस अधिकाऱ्यांची यादी तृप्ती देसाई यांनी केली जाहीर

पुणे : बीड मधील वाल्मिक कराडची टोळी संपवायची असेल तर या पोलिसांच्या बदल्या करा अशी मागणी भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे.तृप्ती देसाई यांनी केली वाल्मिक कराडसाठी काम करणाऱ्या पोलिसांची यादी प्रसिद्ध केली.गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या पोलिसांची चौकशी करून बदली करण्याची देसाई यांनी मागणी केली.पोलिसांच्या बदल्या झाल्या तरच बीडमधील गुंडाराज संपेल असं देसाई यांचं मत आहे.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या वर सातत्याने टीका करण्यास सुरुवात केली आहे.आता तृप्ती देसाई यांनी बीड येथे कार्यरत असलेल्या आणि वाल्मीक कराड यांच्या निकटवर्ती असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया वर बीडमध्ये कार्यरत असलेल्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये हवालदारापासून एपीआय डी वाय एस पी, एडिशनल पोलीस यांचा समावेश आहे. या सर्वांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना केली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या,मी वाल्मीक कराडच्या निकटवर्तीय ,मर्जीतील बीड येथील पोलीस_अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मी येथे शेअर करीत आहे.गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व खात्रीलायक चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणे गरजेचे आहे, तरच आपण बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखू शकतो असं तृप्ती देसाई म्हणल्या.

तृप्ती देसाई यांनी जाहीर केलेली यादी पुढीलप्रमाणे

  1. बाळराजे दराडे बीड ग्रामीण-API
  2. रंगनाथ जगताप , अंबाजोगाई ग्रामीण -API
    3.भागवत शेलार , केज बीट – LCB
    4.संजय राठोड , अंबाजोगाई – additional Police
    5.त्रिंबक चोपने ,केज -Police
    6.बन्सोड ,केज -API
    7.कागने सतिश , अंबाजोगाई – Police
    8.दहिफळे, शिरसाळा-API
    9 सचिन सानप , परळी बिट – LCB
    10.राजाभाऊ ओताडे ,बीड -LCB
    11 बांगर बाबासाहेब, केज -POLICE
    12 .विष्णु फड , परळी शहर – Police
    13.प्रविण बांगर , गेवराई-PI
    14 .अमोल गायकवाड , युसुफवडगाव ड्रायवर Police
    15.राजकुमार मुंडे , अंबाजोगाई DYSP ऑफिस- police
    16.शेख जमिर, धारूर- Police
    17 .चोवले , बर्दापुर – Police
    18 .रवि केंद्रे,अंबाजोगाई- police
    19.बापु राऊत,अंबाजोगाई – Police
    20 .केंद्रे भास्कर,परळी – Police
  3. दिलीप गित्ते , केज DYSP ऑफिस- Police
  4. डापकर- DYSP ऑफिस केज – Police
    23 .भताने गोविंद , परळी -police .
    24.विलास खरात , वडवणी – Police.
    25 . बाला डाकने,नेकनुर – Police
  5. घुगे, पिंपळनेर -API

Exit mobile version